agriculture news in Marathi, congress will expose Mahajanadesh yatra form Mahapardafash yatra, Maharashtra | Agrowon

कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा; महाजनादेश यात्रेची पोलखोल करणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि महापूरासारख्या आपत्तीत सापडलेले असताना आपत्तीग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच, असा चंग बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस पक्ष राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल करणार असून आजपासून (ता. २६) अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार आहे.

मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि महापूरासारख्या आपत्तीत सापडलेले असताना आपत्तीग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच, असा चंग बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस पक्ष राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल करणार असून आजपासून (ता. २६) अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार आहे.

राज्याच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख आणि माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत होत असलेल्या सभेस ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. के. सी. पाडवी, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. बाळू धानोरकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा चारुताई टोकस, युवक काँग्रेसचे प्रदाशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह एनएसयुआय, अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि इतर विभागाचे अध्यक्ष काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रचार समितीचे मुख्य समन्वयक आणि प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिली आहे.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांत विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण- मुंबई या विभागांत सभा होणार आहेत.मोझरी - गुरूकुंज येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही प्रचंड विकास केला आहे, असे विधान करून ''वाद- विवादा'' चे जाहीर आव्हान दिले होते. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान स्वीकारून दुसऱ्याच दिवशीच प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले त्यांना जाहीर चर्चेसाठी तारीख, स्थळ आणि वेळ कळवण्याचे आव्हान दिले होते. हे प्रतिआव्हान न स्वीकारता मुख्यमंत्र्यांनी ''पळ'' काढल्यामुळे काँग्रेस पक्ष आणि निवडणूक प्रचार समितीने त्यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावरून ''महापोलखोल'' सभा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या नियोजनानुसार राज्यभर या सभा होणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...