agriculture news in Marathi, Congress will study of drought in Vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भातील दुष्काळाचा कॉँग्रेस करणार अभ्यास
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

नागपूर  ः दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नांतर्गत कॉँग्रेसने विदर्भातील दुष्काळाची माहिती घेण्यासाठी खास समितीचे गठण केले आहे. ही समिती दुष्काळग्रस्त तालुक्‍यांचा दौरा करीत आपला अहवाल कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सोपविणार आहे.

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे गेले दोन महिने वाहत होते. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी प्रचारात व्यस्त होते. आचारसंहिताही लागू आहे. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले. राज्यातील काही भागांत याच कारणामुळे दुष्काळी चित्र चिंताजनक आहे.

नागपूर  ः दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नांतर्गत कॉँग्रेसने विदर्भातील दुष्काळाची माहिती घेण्यासाठी खास समितीचे गठण केले आहे. ही समिती दुष्काळग्रस्त तालुक्‍यांचा दौरा करीत आपला अहवाल कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सोपविणार आहे.

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे गेले दोन महिने वाहत होते. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी प्रचारात व्यस्त होते. आचारसंहिताही लागू आहे. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले. राज्यातील काही भागांत याच कारणामुळे दुष्काळी चित्र चिंताजनक आहे.

सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात येत असला तरी, प्रत्यक्षात दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरल्याची स्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सर्वदूर भटकंती सुरू आहे. जनावरांच्या पाणी आणि चाऱ्याचा प्रश्‍नदेखील गंभीर झाला आहे. राज्यातील जनतेची अशा प्रकारे दुष्काळात होरपळ सुरू असल्याने कॉँग्रेसने याच मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. 

पक्षाच्या वतीने आता दुष्काळी भागाचे दौरे केले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठित केली आहे. ही समिती तालुक्‍यातील दुष्काळी गावांना भेट देईल. या समितीच्या दौऱ्यात संबंधित जिल्ह्यातील अध्यक्षांना सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्‍न ही समिती जाणून घेणार आहे. त्यासोबतच चारा उपलब्धता, चारा छावण्याची स्थिती, पाण्याची उपलब्धता याचाही आढावा समिती घेणार आहे. 

समितीमध्ये आहे यांचा समावेश
विदर्भातील दुष्काळीस्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्‍त समितीचे विधानसभेतील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार हे अध्यक्ष आहेत. माजी मंत्री वसंत पुरके,, राजेंद्र मुळक, आमदार वीरेंद्र जगताप, रणजित कांबळे, सुनील केदार, राहुल बोंद्रे, अमर काळे, नतीकोद्दीन खतीब, अमित झनक व समिती समन्वयक म्हणून प्रवक्‍ते अतुल लोंढे यांचा समावेश आहे.

इतर अॅग्रो विशेष
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...