शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक

नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला मदत कधी देणार...आदिवासी विदयार्थी अन् पत्रकारांवरील दडपशाहीचा निषेध असो...शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

आज सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी एकत्रित येत सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार आंदोलन केले. त्यामुळे आज जनतेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक राहणार असे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार प्रदीप नाईक, आमदार विजय भाबळे, आमदार संजय कदम, आमदार विक्रम काळे आदींसह आमदार उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com