कर्जमाफीसाठी `आधार` बॅंक खात्याशी जोडा 

योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या ७ जानेवारी २०२० पर्यंत तयार कराव्यात. बॅंक खाते आधार संलग्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व ज्यांचे बॅंक खाते आधार संलग्न नाही, अशा दोन्ही याद्या तयार कराव्यात. बॅंकांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. ज्यांचे बॅंक खाते आधार संलग्न नाही, अशांशी संपर्क साधून सर्व खाती आधार संलग्न करावीत. - डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
कर्जमाफीसाठी `आधार` बॅंक खात्याशी जोडा 
कर्जमाफीसाठी `आधार` बॅंक खात्याशी जोडा 

सांगली : ‘‘राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ जाहीर केली आहे. त्याचा लाभ मिळवण्यासाठी ज्यांनी आधार क्रमांक बॅंक खात्याशी संलग्न केला नसेल, त्यांनी त्वरीत बॅंकेत जाऊन आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी (ता. १) पत्रकार परिषदेत केले. 

कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व बॅंकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आर. पी. यादव, विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

अंमलबजावणीत काही अडचणी असल्यास त्या जिल्हा अग्रणी बॅंकेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील. तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य व्यवस्थापक डीसीसी बॅंक, व्यवस्थापक लिड बॅंक, कमर्शियल बॅंकांचे जिल्हा व्यवस्थापक, अधीक्षक कृषी अधिकारी हे सदस्य, तर जिल्हा उपनिबंधक हे समितीचे सदस्य सचिव असतील. योजनेच्या लाभासाठी मेळावे, कॅम्प होतील. वेळोवेळी बॅंकांमार्फत आढावा घेतला जाईल. 

जिल्हास्तरीय समितीतर्फे तक्रार निवारण

आधार लिंक नसलेल्या खात्यांची यादी ७ जानेवारी २०२० पर्यंत बॅंका, पीसीएएस, गाव चावडी येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

ऑफलाइन तक्रारी तहसीलदारांमार्फत स्वीकारून त्या जिल्हास्तरीय समितीला रोज सादर केल्या जातील. जिल्हास्तरीय समिती सदस्य या तक्रारींचे निवारण करतील. पोर्टलवर बॅंकांनी आधार लिंक केलेला डेटा अपलोड केल्याचे नियमित निरीक्षण करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com