Agriculture news in marathi Conservation of chital fish | Agrowon

संवर्धन चितल माशांचे

उमेश सूर्यवंशी, सोमनाथ यादव
शुक्रवार, 12 जून 2020

चितलमाशांचे बीज पाण्यात सोडण्यापूर्वी तलावाला पक्षी प्रतिबंधक जाळे बसवून घ्यावे. जेणेकरून तलावातील मत्स्यबीज पक्षी खाणार नाही. या माशाला तलावात जिवंत खाद्य पुरविल्यास याची वाढ जोमाने होते. त्यामुळे बीज सोडण्याच्या दोन महिने अगोदर परिपक्व नर मादी तिलापीया किंवा सतत पिल्ले देणाऱ्या माशांच्या प्रजाती जसे गप्पी, कॉमन कार्पसारखे मासे यांचे संचयन करावे.
 

चितलमाशांचे बीज पाण्यात सोडण्यापूर्वी तलावाला पक्षी प्रतिबंधक जाळे बसवून घ्यावे. जेणेकरून तलावातील मत्स्यबीज पक्षी खाणार नाही. या माशाला तलावात जिवंत खाद्य पुरविल्यास याची वाढ जोमाने होते. त्यामुळे बीज सोडण्याच्या दोन महिने अगोदर परिपक्व नर मादी तिलापीया किंवा सतत पिल्ले देणाऱ्या माशांच्या प्रजाती जसे गप्पी, कॉमन कार्पसारखे मासे यांचे संचयन करावे.

चितल हा मासा मांसाहारी असून त्यास खास करून शांत व संथ वाहणाऱ्या पाण्यात राहण्याची सवय असते. या प्रजातींचे वास्तव्य प्रामुख्याने नैसर्गिक स्रोत जसे की नदी, तलाव, कॅनल, तळे, धरणे या ठिकाणी असते. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बंदिस्त तलावात या माशांचे संवर्धन केले जाते. हा मासा अतिशय कणखर असून कमी प्राणवायू असलेल्या पाण्यातदेखील जोमाने वाढतो. या माशाचे संवर्धन करताना पाण्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असू नये. प्रजनन कालावधीत हा मासा गोड्या पाण्याकडून निमखाऱ्या पाण्याकडे प्रजननासाठी जातो. इतर माशांच्या तुलनेत या माशांना चांगला बाजारभाव मिळतो.

प्रजनन
सर्वसाधारणपणे चितळ मासे धरणाच्या पाण्यात, तळ्यात, पान वनस्पतींवर अथवा दलदलीच्या ठिकाणीदेखील अंडी घालतात. त्यांचा प्रजनन कालावधी जून ते जुलै महिन्यात असतो. प्रजनन काळात ते पाण्यात जमिनीला खड्डे करून राहतात. चितल मासे आपल्या पिल्लांची काळजी घेतात.

संवर्धन तलावाची निवड 

  • चितल माशांच्या संवर्धनासाठीचे तळे हे लोकवस्तीपासून दूर असावे.
  • तळ्याच्या परिसरात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश असावा.
  • तळ्यातील पाणी प्रदूषणविरहित असावे.
  • तळे सर्वसाधारण अर्धा एकर ते एक एकरपर्यंत असावे.

संवर्धन तयारी

  • तळ्यामध्ये वाढलेल्या पाणवनस्पती काढून टाकाव्यात. तसेच तळे पूर्णपणे रिकामे करून २ आठवड्यांसाठी सूर्यप्रकाशात ठेवावे. तळ्यात चुना मारून झाल्यानंतर एक आठवड्यानंतर १ ते १.५ मीटर उंचीपर्यंत पाणी भरून घ्यावे.
  • चुना मारून एका आठवडा झाल्यानंतर तळ्यात हेक्टरी २००० किलो शेणखत, ५० किलो युरिया आणि ५० किलो टी.एस.पी. या प्रमाणात मारून घ्यावे.
  • चितलमाशांचे बीज पाण्यात सोडण्यापूर्वी तलावाला पक्षी प्रतिबंधक जाळे बसवून घ्यावे. जेणेकरून तलावातील मत्स्यबीज पक्षी खाणार नाही.

खाद्य व्यवस्थापन
चितळ हा मासा मांसभक्षक असल्यामुळे याच्या आहारात मत्स्य कुटी, झिंगे, इतर लहान मासे, गोगलगाय, कवचधारी प्राणी व कीटक इत्यादींचा समावेश होतो. तसेच या माशाला तलावात जिवंत खाद्य पुरविल्यास याची वाढ जोमाने होते. याकरिता चितल माशाचे बीज तलावात सोडण्याच्या दोन महिने अगोदर परिपक्व नर मादी तिलापीया किंवा सतत पिल्ले देणाऱ्या माशांच्या इतर प्रजाती जसे गप्पी, कॉमन कार्प सारखे मासे यांचे संचयन करावे. जेणेकरून तिलापीया माशांनी पिल्ले दिल्यावर चितल माशांच्या बिजाला खाद्य उपलब्ध होईल.

बीज संचयन
एक एकर तलावात ३ इंच आकाराचे १० ते १५ हजार या संचयन घनतेने चितळ बीज सोडावेत.

मासे तलावातून पकडणे 

  • बाजारातील मागणीनुसार योग्य आकारमानाचा चितल मासा तलावात वाढल्यानंतर पकडता येतो. योग्य व्यवस्थापन केल्यास हा मासा एका वर्षात १ ते १.५ किलोपर्यंत वाढू शकतो. मासे तलावातून काढल्यानंतर त्यांची जिवंत विक्री देखील करता येते. जिवंत विकलेल्या माशांना जास्त दर मिळतो.
  • जाळ्याच्या साह्याने किंवा तळे पूर्णपणे रिकामे करून चितळ मासे पकडता येतात.

संपर्क - उमेश सूर्यवंशी, ९०९६९००४८९
(मत्स्य विज्ञान महाविद्यालय, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)


इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...