Agriculture news in marathi Conservation of Dutch and Portuguese warehouses in Konkan | Agrowon

कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार संवर्धन 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी डच आणि पोर्तुगाल राजवटींसह छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कोकणात उभारलेल्या वखारींचे संवर्धन होणार आहे.

पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी डच आणि पोर्तुगाल राजवटींसह छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कोकणात उभारलेल्या वखारींचे संवर्धन होणार आहे. वखारींचे संवर्धन होऊन त्या ठिकाणी ऐतिहासिक व्यापाराच्या माहितीचे संग्रहालय करावे, अशी मागणी जुन्नरच्या (जि.पुणे) सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने राज्य वखार महामंडळाकडे केली आहे. या बाबत महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी महामंडळाच्या सामाजिक दायित्व निधीद्वारे संवर्धनासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. 

सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने वखार महामंडळाला पत्र दिले आहे. या बाबत बोलताना ‘सह्याद्री’ चे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ १९५७ पासून कार्यरत असून, महामंडळाच्या वतीने राज्यातील अन्नधान्य साठवणुकीसाठी २०० पेक्षा अधिक ठिकाणी १ हजार १०० गोदामे उभारली आहेत. या गोदामांचा उपयोग शेतकऱ्यांना होतो आहे.

वखार महामंडळाद्वारे नव्याने अत्याधुनिक गोदामे उभारली जात असताना, मात्र भारतात सागरी मार्गाद्वारे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डच, पोर्तुगीज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कोकणात आणि विशेषतः राजापूर, वेंगुर्ले परिसरात सागरी किनारपट्टीलगत अनेक वखारी बांधल्या. मात्र काळाच्या ओघात या वखारींची पडझड झाली असून, त्या शेवटच्या घटका मोजत आहेत.’’ 

कोकणातील ऐतिहासिक वखारी या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. सागरी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा इतिहास येणाऱ्या पिढीला ज्ञात व्हावा, यासाठी या वखारींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी राजापूर आणि वेंगुर्ले येथील इतिहासप्रेमी, अभ्यासकांनी अनेक वेळा शासनाच्या शासनाच्या विविध विभागांसोबत पाठपुरावा केला. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. राज्य वखार महामंडळ मोठ्या प्रमाणावर राज्यात गोदामे (वखारी) उभारत आहे.

मात्र वखार महामंडळाच्या निदर्शनास कोकणातील ऐतिहासिक वखारींच्या संवर्धनाची बाब निदर्शनास आणून दिली नाही. या बाबत आम्ही वखार महामंडळाला त्यांच्याच क्षेत्रातील वखारींच्या दुर्देशीची बाब निदर्शनास आणून देत वखारींच्या संवर्धनाची मागणी केली आहे. या बाबत वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे सकारात्मक आहेत. 

पुरातत्त्व, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागासोबत समन्वय साधावा 
कोकणातील वखारींचा पुरातत्त्व, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध असल्याने राज्य शासनाच्या या तीन विभागासोबत वखार महामंडळाने समन्वय साधत संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. या चार विभागांनी समन्वय साधत किमान एका वखारीचे संवर्धन करून, त्या ठिकाणी भारताच्या सागरी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माहितीचे संग्रहालय उभारावे. या संग्रहालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक ठेवा देखील संवर्धित होऊन, पर्यटकांना चांगली माहिती मिळेल, असेही संस्थेने सुचविले आहे. 

प्रतिक्रिया

कोकणातील वखारींच्या संवर्धनाबाबतची बाब प्रथमच निदर्शनास आली. सागरी किनारपट्टीलगत असलेल्या वखारी या भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार इतिहासाचा वारसा आहे. त्याच्या संवर्धनासाठी संबंधित विविध विभागासोबत समन्वय साधत, सकारात्मक कार्यवाही करू. 
-दीपक तावरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक 
राज्य वखार महामंडळ, पुणे 
 


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...