agriculture news in Marathi conservation of mosambi varieties important for research Maharashtra | Agrowon

संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर : कृषी सचिव एकनाथ डवले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

मोसंबी फळपिकांच्या विविध वाणांचा संग्रह करून त्याचे संवर्धन केल्यास भविष्यातील संशोधनास चालना मिळण्यास मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.

बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध वाणांचा संग्रह करून त्याचे संवर्धन केल्यास भविष्यातील संशोधनास चालना मिळण्यास मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.

मोसंबी संशोधन केंद्र व तूर संशोधन केंद्रास नुकत्याच दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीधारी वाघमारे, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील, तूर संशोधन केंद्राचे डॉ. दीपक पाटील, कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित  होते. या वेळी केंद्रात नव्याने लागवड करण्यात आलेल्या अलीमो, रंगपूर या खुंटाची तसेच विक्रम, प्रमालिनी, अकोला बहार, साई सरबती, एनआरसी ७, ८ चक्रधर आदी लिंबू वाणाची आणि नुसेलर, काटोल गोल्ड, पॅरा, जाफा, ब्लड रेड, वॉशिंग्टन, हमलीन आदी मोसंबी वाणांची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिली. 

या वेळी श्री. डवले म्हणाले कि, या केंद्रास विविध वाणांचे जतन व संग्रह व संशोधन करण्यासाठी शासन सर्वतोपरी आर्थिक मदत देईल. त्यासाठी केंद्राने रीतसर प्रस्ताव सादर करावा. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या विक्रम आणि प्रमालिनी या चांगल्या लिंबू वाणांचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करण्यावर भर द्यावा. केंद्रातील संशोधन सहायक त्रिवेणी सांगळे यांनी आभार मानले.

संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. के. पाटील यांनी श्री. डवले यांना संशोधनासाठी संग्रहित पिकांच्या जातीचे वाईल्ड गार्डन, बीजोत्पादन आदींविषयी सविस्तर माहिती दिली. संशोधनाचे कार्य , त्यातील बारकावे जाणून घेण्यासोबतच येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या. 

या वेळी केंद्राच्या माध्यमातून आवश्यक शास्त्रज्ञ, कर्मचारी आदी मनुष्यबळाची तसेच मोसंबी संशोधन केंद्र, तूर संशोधन केंद्र, डाळवर्गीय पीक संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय आदी पाहता सर्वांना उपयोगी पडेल, अशी केंद्रीय मध्यवर्ती सुधारित प्रयोगशाळा आवश्यक असल्याची व त्यासाठी शासनाचा पुढाकार आवश्यक असल्याची माहिती सचिव श्री. डवले यांना देण्यात आली.

उडीद वाणाच्या संशोधनावर हवा भर
तूर, मूग व इतर पिकांच्या वाणात दखलपात्र संशोधन झाले आहे. त्या तुलनेत उडिदाच्या संशोधनात मात्र आपण मागे आहोत. त्यामुळे यापुढील काळात उडिदाच्या संशोधनात विशेष लक्ष देण्याची गरज सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केली. बदनापूर येथील तूर संशोधन केंद्राच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. 
 


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...