Agriculture news in Marathi Conservation of native cow breeds is required | Page 2 ||| Agrowon

देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना या राज्यांमध्ये जुन्या प्रजातीची संख्या कमी आहे.

पुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना या राज्यांमध्ये जुन्या प्रजातीची संख्या कमी आहे. मात्र, महाराष्ट्रात सुदैवाने सहा ते सात प्रजाती व काहींच्या उपप्रजाती आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे महाविद्यालयात सुरू केलेले देशी गोवंश संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्फूर्तिदायक बनेल, असा विश्वास कण्हेरी मठाचे श्री. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग व देशी गोवंश संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘देशी गोपालक व गोशाळा चालक’ परिसंवाद हा कार्यक्रम मंगळवारी (ता. १९) डॉ. शिरनामे सभागृहात झाला. 

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, ‘वनामकृवि’चे डॉ. स्मिता सोळंकी, परभणी पशुवैद्यकीय सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, प्रा. देवदत्त हजारे, संतोष राऊत, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. धीरज कणखरे, डॉ. प्रमोद साखरे, प्रा. रामदास शेंडे आदी उपस्थित होते. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी प्रास्ताविक केले. सहशास्त्रज्ञ डॉ. सुनील अडांगळे यांनी आभार मानले.

साहिवालच्या सहा हजारांच्या सहा लाख गाई होण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी कृषी योजनांसाठी जसे अनुदान दिले जाते, त्याप्रकारे गोपालनासाठी अनुदान दिले तर शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल.
- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू

दापोली कृषी विद्यापीठातही गोपालनाचा विस्तार केला जाईल. गोपालन केल्यामुळे गाईच्या शेणापासून विविध वस्तू बनविल्या जातात. त्यामुळे गोपालनाचे महत्त्व वाढले आहे. कोकणात कपिला गाईचे ब्रीड रजिस्टर केले आहे. 
- डॉ. संजय सावंत, कुलगुरू
 


इतर अॅग्रो विशेष
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला...पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत:...
कृषी सुधारणांचा अंत की पुनरुत्थान? :...केंद्र सरकारने पुन्हा एक समिती नेमून नव्याने...
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे...पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-...
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश...केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द...
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र :...केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधारऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...
उडीद, मुगाच्या उत्पादनात घट नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...