agriculture news in Marathi conservation on traditional rice seed Maharashtra | Agrowon

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील पारंपरिक भातबियाणे लागवडीखाली आणणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

सकस आणि पौष्टिक मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातील २७ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ५ पारंपरिक भातबियाण्यांवर संशोधन करून ते लागवडीखाली आणण्याचा निर्णय फोंडाघाट कृषी संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत झाला.

सिंधुदुर्ग: सकस आणि पौष्टिक मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातील २७ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ५ पारंपरिक भातबियाण्यांवर संशोधन करून ते लागवडीखाली आणण्याचा निर्णय फोंडाघाट कृषी संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत झाला. याशिवाय दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सोबत बैठकीचे आयोजन करण्याचेही निश्‍चित करण्यात आले.

पारंपरिक भातबियाणे पुनरूज्जीत करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील काही प्रमुख संशोधक, शेतकऱ्यांची फोंडाघाट( ता.कणकवली) येथील कृषी संशोधन केंद्रात शनिवारी (ता.६) बैठक झाली. या बैठकीला संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही.एन. शेट्ये, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सांवत, बाएस संस्थेचे डॉ. सचिन चोरगे, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, प्रवीण सांवत, शरद धुरी आदी उपस्थित होते. 

कुडाळ येथील बाएस संस्थेच्या माध्यमातून सीड बँक स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील २७ तर रत्नागिरीतील ५ भात बियाण्यांचे संकलन करण्यात आले आहे. या बियाण्यांमधील सोंफळा, लाल व सफेद वालय, खारा मुनगा, रूची, सोनाक्षी, घाटी पकंज, एलकट, सोरटी ही बियाणे शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणण्याचे दृष्टीने प्रयत्न करण्याचे बैठकीत निश्‍चित करण्यात आले. यातील काही बियाण्यांवर बाएस मार्फत प्राथमिक संशोधन करण्यात आले आहेत.

त्यापैकी काही प्रयोग यशस्वी झाले असून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्‍यक आहे. पारंपरिक भातबियाणे लोप पावत चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बीजोत्पादन करण्यासाठी देखील प्रोत्साहित करण्यावर भर दिला पाहिजे याविषयी उपस्थित सर्व संशोधक, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचे एकमत झाले.
श्री. सांवत यांनी ही बैठक कुलगुरूशी चर्चा करून आपण निश्‍चित करू असे सांगतानाच पुढील हंगामांत पारंपरिक भातबियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येतील अशा पद्धतीने प्रयत्न करूया, असे आवाहन केले. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...