आवर्तनात पाणीबचत केल्यास सत्कार करणार ः जलसंधारणमंत्र्यांनी दिला शब्द 

Conservation of water in recirculation: Irrigation Minister take word
Conservation of water in recirculation: Irrigation Minister take word

नगर ः यंदा सर्व धरणे लवकर भरली. परतीचा पाऊसही जोरदार कोसळला. त्यामुळे सध्या विहिरी, कूपनलिका, नद्या, गाव तलाव, पाझर तलावासह स्रोताला पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बीसाठी आवर्तन सोडताना पाणी बचत होऊ शकते. बचत झालेले पाणी पुढच्या टंचाईच्या काळात कामी येईल, सध्याची परिस्थिती पाहता आवर्तनात पाणी बचत करा, जाहीर सत्कार करू, असा शब्द जलसंधारणमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आणि अधिकाऱ्यांनीही पाणी बचत करण्याचा निर्धार केला.

नगर जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि गोदावरी या दोन पाणलोटातून शेतीसह पिण्यासाठी पाण्याचा वापर होते. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे मोठी धरणे गोदावरी खोऱ्यात आहेत. राहुरी, नेवासा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले या तालुक्याला या धरणातील पाण्याचा लाभ मिळतो. गोदावरी खोऱ्यात साधारण १७ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. तिन्ही धरणातील मिळून पिण्यासाठी, औद्योगिकसाठी आणि शेतीसाठी पाण्याचा वापर केला जातो. यंदाही असेच नियोजन केले आहे. आवर्तनासंदर्भात तीन दिवसांपूर्वी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात पाटबंधारे विभागाचे अधिकारी किरण देशमुख यांनी आवर्तन आणि उपलब्ध पाण्याबाबत मंत्र्यांना माहिती दिली. 

नगर जिल्ह्यातील पाण्याबाबतची संपूर्ण माहिती असलेले आणि पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलन केलेले जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी पाणी आवर्तनाबाबतची शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आवर्तनातून पाणी बचत करण्याबाबत अधिकाऱ्यांना आवाहन केले. यंदा धरणे लवकर भरली, शिवाय परतीच्या वेळी जोरदार पाऊस  झाला. त्यामुळे सर्वच्या सर्व स्रोताला बहुतांश भागात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. 

अधिकाऱ्यांनी काळजी घेतली तर धरणातील साधारण पाच ते सहा टीएमसी पाणी बचत होऊ शकते. तेच पाणी पुढील टंचाईच्या काळात वापरता येईल. तुम्ही प्रयत्न करा, तुमचा जाहीर सत्कार करू, असे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनीही किमान पाच ते सहा टीएमसी पाणी बचत करण्याचा मंत्र्यांना शब्द दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com