Agriculture news in Marathi, Considering onion eaters, then why not the onions producer? | Page 3 ||| Agrowon

कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग पिकवणाऱ्यांचा का नाही?

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारच्या एम.एम.टी.सी. व्यापार कंपनीने दोन हजार टन कांद्याच्या आयातीची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातीचे मूल्य टनाला ८५० डॉलर इतके निश्‍चित केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. खाणाऱ्यांचा विचार होतो, मात्र शेतकऱ्यांचा विचार का होत नाही? असा संतप्त सवाल शेतकरी करत असून त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. समाजमाध्यमावर त्यांचे तीव्र पडसाद उमटले आहेत. 

नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारच्या एम.एम.टी.सी. व्यापार कंपनीने दोन हजार टन कांद्याच्या आयातीची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातीचे मूल्य टनाला ८५० डॉलर इतके निश्‍चित केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. खाणाऱ्यांचा विचार होतो, मात्र शेतकऱ्यांचा विचार का होत नाही? असा संतप्त सवाल शेतकरी करत असून त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. समाजमाध्यमावर त्यांचे तीव्र पडसाद उमटले आहेत. 

राज्यात कांद्याचे दर वाढल्याने सरकारने पाकिस्तानमधून कांदा आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून योग्य दर नसल्याने शेती तोट्यात आहे. त्यात आता कुठं कांद्याचे दर वाढले आहेत, तर सरकार बाहेरुन कांदा आयात करत आहे. सरकारसाठी पाकिस्तानपेक्षा भारतीय शेतकरी जास्त मोठे शत्रू वाटत आहे. अगोदरच शेतकरी अडचणीत असताना कांदा उत्पादकाला अडचणीत आणण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा संतापजनक प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. 

केंद्र शासनाचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगवेगळे दोन निर्णय घेत दोन मोठे धक्के दिले आहेत. परदेशातून कांदा आयात करण्याची निविदा काढल्यानंतर कांदा निर्यातमूल्यात तब्बल ८५० डॉलरची वाढ केली जाणार आहे. या दोन्ही निर्णयामुळे कांद्याच्या भावात घसरण होणार आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत.

सध्या विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. नाशिक, नगर, पुणे येथे अजूनही शेतकऱ्यांकडे चाळीत कांदा शिल्लक असताना शहरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुटपुंज्या आयातीचे चित्र निर्माण केले आहे. कांदा उत्पादकांचा व विरोधकांकडून टीकेचा भडीमार झाल्यामुळे आयातीचा निर्णय मागे घेण्यात आला. हे केंद्र सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे.
- कुबेर जाधव, शेती प्रश्नाचे अभ्यासक, देवळा.

सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आले आहे. सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताला विरोध आहे. कांद्याचे दोन पैसे मिळत असताना सरकारच्या पोटात गोळा उठला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारने कांद्याच्या बाबतीत धीराने अवलंबले तर शेतकरी सरकारला जागा दाखवून देतील.- गोविंद पगार, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक जिल्हा.


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन बियाणे उगवणीबाबत ९२५०...नांदेड: नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
‘आरबीआय’चे नियंत्रण सहकार मोडीत...सातारा : सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे...
खरिपाची ३१५ लाख हेक्टरवर पेरणी नवी दिल्ली: यंदा देशभरात मॉन्सून वेळेआधीच दाखल...
खानदेशात मृग बहारातील केळी लागवड...जळगाव ः खानदेशात मृग बहार (जून व जुलैमध्ये लागवड...
डाळिंबाच्या विम्याचे पैसे वर्षानंतरही...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या हवामानावर...
सदोष बियाणे उत्पादक कंपन्यांनी भरपाई...अमरावती: सदोष बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या...
बंदरात अडकलेल्या आयात वस्तू सोडा पुणे : चीनमधून आयात होत असलेल्या सुट्या भागांचे...
बारा हजार कोटींची कीडनाशकांची बाजारपेठ...पुणे : केंद्र शासनाने कीटकनाशकांवर आणलेल्या...
पणन संचालकांसह परभणी जिल्हा ...औरंगाबाद ः जिंतूर (जि. परभणी) बाजार समितीच्या...
सोयाबीनची उगवण न झाल्याने जड अंतकरणाने...अकोला ः बियाण्याचा दर्जा, पावसाचा खंड व इतर...
राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय पुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने...
लघू अन्नप्रक्रिया समूहांसाठी ३५ हजार...पुणे : देशातील लघू अन्नप्रक्रिया समूहांसाठी (...
लोणच्याच्या कैरीचे उत्पादन घटलेनाशिक : चालू वर्षीच्या हंगामात नैसर्गिक...
वराहपालन, अन्य पूरक व्यवसायातून आर्थिक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरवडे येथील सुनील देसाई...
संयुक्त कुटुंबाने दुग्धव्य़वसायातून दिली...खडकी (ता. जि. नांदेड) येथील कदम यांचे तब्बल ३५...
विदर्भाच्या कॅलिफोर्नियात बंदी असतानाही...अमरावती : जलपुनर्भरण, जलसंवर्धनाच्या...
बोगस बियाणेप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल...मुंबई : ग्रामीण भागातून बोगस बियाण्याच्या तक्रारी...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुणे : मॉन्सूनने देश व्यापल्यानंतर राज्यातही...
लोकसहभागातून गावे समृद्ध करा :...कोल्हापूर : लोकसहभागातून गावेच्या-गावे समृद्ध करा...
लालपरीचा संचित तोटा सहा हजार कोटींवर सोलापूर : लॉकडाउनच्या शिथिलतेनंतरही एस.टी....