व्यवसायात सातत्यपूर्ण काम केल्यास यश ः सोनुने 

व्यवसायात सातत्यपूर्ण काम केल्यास यश ः सोनुने 
व्यवसायात सातत्यपूर्ण काम केल्यास यश ः सोनुने 

जालना : कृषी विज्ञान केंद्र हे नेहमी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करतात. तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करून नावीन्यपूर्ण पद्धतीने लोकांपर्यंत पोचण्यासह व्यवसायात सातत्यपूर्ण काम केल्यास यश नक्की मिळते. आपले  व्यवसायातील यश दुसऱ्यासाठी रोजगारनिर्मितीची पायरी असते, असे मत खरपुडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी व्यक्त केले. 

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी जालना येथे शुक्रवारी (ता. १२)आयोजित करण्यात आली होती.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, निवृत्त तंत्र अधिकारी, कृषी विभाग, जालन्याचे एन. एस. पुंड, रुपाली पवार,  विशाल डेंगळे, काकासाहेब साबळे व अन्न तंत्र विभागाचे शशिकांत पाटील यांची उद्‌घाटन सत्रात उपस्थिती होती.

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कोणकोणते व्यवस्था ग्रामीण भागात करता येऊ शकतात. त्यामध्ये, दालमिल, फळे व भाजीपाला वाळवणी, मसाला प्रक्रिया, दूध प्रक्रिया, लोणचे प्रक्रिया तसेच विविध फळे यापासून सिरप, पल्प व पेय तयार करणे, जॅम जेली मर्मलेंड अशा विविध प्रकारच्‍या उद्योगांची माहिती दिली. त्यामध्ये मशिनरीची आवश्‍यकता, विविध परवाने, पॅकिंग व ब्रॅड विकसित करणे या विषयांवर शशिकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेची माहिती नंदकिशोर पुंड यांनी दिली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांच्या सदस्यांनी खचून न जाता गावा गावात छोट्या मोठ्या प्रमाणावर कृषी प्रक्रिया उद्योग सुरू केले तर आपली आर्थिक परिस्थिती बदलेल, असे मत प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com