कृष्णा खोऱ्यात पाणी देण्यासाठी विचाराधीन ः श्रीकांत हुद्दार

कृष्णा खोऱ्यात पाणी देण्यासाठी विचाराधीन ः श्रीकांत हुद्दार
कृष्णा खोऱ्यात पाणी देण्यासाठी विचाराधीन ः श्रीकांत हुद्दार

कोयनानगर, जि. सातारा ः शासनाने कोयना धरणाच्या जलनीतीमध्ये बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा फटका कोयना जलविद्युत प्रकल्पाला बसणार नाही. त्याची दक्षता घेऊनच कोयनेच्या जलनीतीत बदल केला जाईल. पश्‍चिमेकडे वीज प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या पाणीसाठ्याला धक्का न लावण्याचे धोरण आहे. कृष्णा खोऱ्यात दहा टीएमसी पाणीसाठा देण्यावर विचारविनिमय सुरू आहे, अशी माहिती शासनाने नियुक्त केलेल्या अभ्यास गटाचे सदस्य व कोयनेचे निवृत्त मुख्य अभियंता श्रीकांत हुद्दार व दि. ना. मोरे यांनी दिली. 

कोयना धरणाच्या जलनीतीत बदल करून पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी दिला जाणारा पाणीसाठा पूर्वेकडे कृष्णा खोऱ्यात वळविण्याच्या विचाराधीन आहे. शासनाने यासाठी अभ्यास गटाची निर्मिती केली आहे. या अभ्यास गटातील जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार, दि. ना. मोरे यांनी कोयना प्रकल्पाची पाहणी केली. 

या वेळी पुणे येथील कोयना संकल्पचित्र मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एम. सांगळे, मुंबईच्या महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता अभिजित कुलकर्णी, पोफळीच्या महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता विजय तायडे, निवृत्त मुख्य अभियंता चंद्रशेखर बाबर, अधीक्षक अभियंता ब्रह्मानंद कोष्टी, कार्यकारी अभियंता राजेंद्र इकारे, प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील उपस्थित होते. 

हुद्दार म्हणाले, ‘‘पिण्याच्या पाण्यासाठी व शेती सिंचनासाठी राज्यात पाण्याची मागणी होत आहे. कोयनेत मुबलक पाणीसाठा आहे. कोयनेतील या पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जात असला, तरी राज्यात अन्य पर्यायाच्या माध्यमातून वीजनिर्मिती करणे शक्‍य आहे. यामुळे पश्‍चिमेकडे देण्यात येणारा ६७.५० टीएमसी पाणीसाठा हा वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करून कृष्णा खोऱ्यात वळविता येणे शक्‍य आहे. पश्‍चिमेकडे वीजनिर्मिती झाल्यानंतर समुद्रामार्गे वाया जाणारे ६७.५० टीएमसी पाणीसाठा वाया जातो, तो पाणीसाठा वाया जाऊ न देता परत तेच पाणी कोयना धरणात उदचंन योजनेच्या माध्यमातून परत आणून त्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचे विचाराधीन आहे.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com