Agriculture news in marathi, Constellation of farmers during paddy harvest in Ratnagiri district | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात भात कापणीवेळी शेतकऱ्यांची तारांबळ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

शेतात पाणी साचून राहिल्याने कापणी केलेले भातपीक सुकवण्याची अडचण आहे. त्यामुळे पीक कापून सरळ घरी आणत आहोत. यामध्ये अधिक कष्ट करावे लागते. पावसाने तोंडचे पाणीच पळविले आहे. अचानक येणाऱ्या पावसाने तारांबळ उडत आहे. 
- गंगाराम मोहिते, शेतकरी

शनिवारी (ता. २) सकाळी पाऊस नव्हता म्हणून भातशेती कापायला सुरवात केली. पण, काहीवेळातच पावसाने गाठले. कापलेला भात भिजला. दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने पंचाईत झाली. मळ्यात साचलेल्या पाण्यात कापलेले भात तरंगत होते.
- डॉ. विवेक भिडे, शेतकरी, गणपतीपुळे

रत्नागिरी : पावसाचा जोर ओसरला असला, तरीही लहरी निसर्गामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे कापलेले भात पीक पाण्यात भिजून खराब होत आहे. पाणथळ शेतात पाणी साचल्यामुळे भात कापणीत अडथळा येत आहे. मंडणगड, संगमेश्‍वरसह रत्नागिरी तालुक्यातील काही गावांमध्ये गुडघाभर पाण्यात उभे राहून भात कापणी करावी लागत असल्याची स्थिती आहे.

क्यार वादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका भातशेतीला बसला आहे. हमखास उत्पन्न देणाऱ्‍या शेतात पाणीच पाणी साचले आहे. भातपीक वाया गेले आहे. उरल्यासुरल्या पिकातून काहीतरी उत्पादन मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापणीची कामे वेगाने सुरू केली आहेत. त्यावरही पावसाचे सावट आहे. ग्रामीण भागात दिवसा पावसाचा, तर रात्री जंगली श्वापदांचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी सकाळी शेतात जात असून ऊन तापायच्या आधी जमेल तेवढी कापणी करीत आहेत. संध्याकाळी हमखास येणाऱ्‍या पावसाच्या सरींमुळे कापलेले पीक दुपारनंतर घरी आणण्यात येत असल्याचे चित्र आहे. 

पीक ओले असल्याने आणायला जड जात आहे. घरी आणलेल्या भातावर प्लॅस्टिक टाकून ते वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओलसरपणा असल्याने त्याला बुरशी लागण्याचा धोका आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर घराच्या ओटीवर, मंडपधारी अंगणात आणलेल्या भाऱ्यांची झोडणीसुद्धा सुरू आहे. पाणथळ भागातील पीककापणी करण्याचे आव्हान शेतकऱ्‍यांपुढे आहे.

प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी उपळटीचे पाणी शेतात साचून राहिले आहे. त्यात कापणी करताना शेतकऱ्‍यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरातील नदी किनारी ही अडचण येत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...
पाच जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य...अकोला  : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य...