राज्यात दहा हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार ः चंद्रकांत पाटील

राज्यात दहा हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार ः चंद्रकांत पाटील
राज्यात दहा हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार ः चंद्रकांत पाटील

अकोला ः  दहा वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ४० टक्के उधारीवर रस्त्यांचे बांधकाम करण्याची योजना राज्य सरकार राबवित आहे. त्या अंतर्गत राज्यात १० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार अाहेत. त्यातील चार रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (ता. पाच) अकोला येथे होत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अकोला जिल्ह्यातील ५२० किलोमीटरच्या चार प्रमुख रस्त्यांचे भूमिपूजन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, वाशीम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा हर्षदा देशमुख, यांच्यासह इतर उपस्थित होते.  

श्री. पाटील यांनी हायब्रिट ॲन्युईटीअंतर्गत राज्यात १० हजार किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम नियोजित असल्याचे सांगितले. हे रस्ते ६० टक्के राज्य शासनाचा हिस्सा व ४० टक्के उद्योजकाचे उधारीवरील निधीतून बांधण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. १० वर्षे रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार असून, रस्त्याचा दर्जा बघूनच दरवर्षी त्याचे देयक दिले जाईल. उधारीवर रस्ते बांधतोय याचा अर्ध राज्य शासनाकडे पैसे नाही, असे नव्हे तर दहा वर्षे कंत्राटदाराची मानगुटी शासनाच्या हातात राहून रस्ते खराब होणार नाही, यासाठी ही योजना असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बजेट १७०० कोटींचे होते. ते आता सात हजार कोटींवर पोचले आहे. 

खासदार सुळेंना चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांची पोलखोल करताना खड्ड्यांसोबत सेल्फी मोहीम राबविली होती. त्याला उद्देशून कोपरखळी करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील ५० टक्के रस्त्यांचा दर्जा एवढा चांगला होणार आहे की, सेल्फी काढण्यासाठीही खड्डा मिळणार नाही. काँक्रीटचे रस्ते असल्याने खड्डा खोदूनही सेल्फी काढता येणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com