Agriculture news in Marathi Construction of dam in Khamgaon taluka | Agrowon

खामगाव तालुक्यात बंधाऱ्याची निर्मिती

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

‘सकाळ रिलीफ फंडा’तून खामगाव तालुक्‍यातील शहापूर व लोणी कदमापूर शिवारात सिमेंट काँक्रिट बंधारा व नाला खोलीकरण करण्यात आला आहे. या कामांमधून परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे.

बुलडाणा ः ‘सकाळ रिलीफ फंडा’तून खामगाव तालुक्‍यातील शहापूर व लोणी कदमापूर शिवारात सिमेंट काँक्रिट बंधारा व नाला खोलीकरण करण्यात आला आहे. या कामांमधून परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. या कामांचे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे, जलस्रोत बळकट करणे, भूजलपातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झालेले आहे. याच उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला. शिवाय नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. ही कामे पूर्ण झाली असून श्रीमती रुख्मिणीबाई दादाराव तिडके यांच्‍याहस्‍ते बंधारास्‍थळी फीत कापून लोकार्पण करण्यात आले. 

कार्यक्रमाला करुणा तिडके, गजानन महाराज शिक्षण संस्‍थेचे विश्वस्‍त राजेंद्र शेगोकार, ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, खामगाव येथील नायब तहसीलदार सुरेखा जगताप, तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी, ‘सकाळ’चे वरिष्ठ वितरण व्‍यवस्‍थापक विजय वरफडे, लोणी गुरवचे सरपंच जानराव इंगळे, माजी सरपंच देवानंद इंगळे, शहापूरच्‍या सरपंच सविता प्रमोद कर्डेल आदी उपस्‍थित होते. रुख्मिणीबाई तिडके यांनी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्‍या माध्यमातून या भागात झालेल्‍या या बंधाऱ्याचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात कार्यकारी संपादक श्री. भारंबे म्हणाले, केवळ बातम्या छापणे एवढेच कार्य ‘सकाळ’ माध्यम समूह करीत नाही तर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये प्रत्‍यक्ष सहभाग घेते. अनेक लोकोपयोगी कामे ‘सकाळ’च्‍या माध्यमातून केली जातात. जलसंधारणाचे काम हा एक उपक्रम असून जलस्रोत बळकट करून भूजलपातळी वाढण्याचे काम सकाळ रिलीफ फंडामार्फत राज्यात केले जाते. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत मांडले.


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...