ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी शिबिरे घ्या ः ऊर्जामंत्री राऊत

सोलापूर: वीज ग्राहकांच्या बिलविषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे, स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करावे, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले.
 Consumer electricity bill complaints Take camps to solve: Energy Minister Raut
Consumer electricity bill complaints Take camps to solve: Energy Minister Raut

सोलापूर : वीज ग्राहकांच्या बिलविषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे, स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करावे, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले. 

लॉकडाउनच्या काळातील एकत्रित वीजबिलामुळे ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम तातडीने दूर करण्यासाठी डॉ. राऊत यांनी सदर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill या लिंकवर ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे, शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करावे, असे आवाहन राऊत यांनी केले. 

महावितरण वीज ग्राहकांचे समाधान करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच, ग्रामीण व शहरी भागातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांचा सर्वसमावेशक स्वतंत्र व्हॉट्सएप ग्रुप उपविभागीय अधिकारी स्तरावर तयार करून त्यावर वीजबिलाची संपूर्ण माहिती देऊन वीजविषयक समस्या, शंकांचे संपूर्ण समाधान करावे, त्यांचे सोबत वेबिनार आयोजित करून संवाद साधावा, असे त्यांनी सुचविले.  विशेष शिबिरे, ग्राहक मेळावे घ्या 

‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार, शहरी भागात महत्त्वाच्या, मोक्याच्या ठिकाणी, तर ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या दिवशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजारासाठी येत असतात. तेथील नजीकच्या हॉल, कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करून ‘विशेष शिबिरे/ग्राहक मेळावे’ घेऊन वीज ग्राहकांचे समाधान करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com