Agriculture news in marathi Consumer electricity bill complaints Take camps to solve: Energy Minister Raut | Agrowon

ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी शिबिरे घ्या ः ऊर्जामंत्री राऊत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

सोलापूर : वीज ग्राहकांच्या बिलविषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे, स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करावे, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले. 

सोलापूर : वीज ग्राहकांच्या बिलविषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे, स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करावे, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले. 

लॉकडाउनच्या काळातील एकत्रित वीजबिलामुळे ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम तातडीने दूर करण्यासाठी डॉ. राऊत यांनी सदर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill या लिंकवर ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे, शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करावे, असे आवाहन राऊत यांनी केले. 

महावितरण वीज ग्राहकांचे समाधान करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच, ग्रामीण व शहरी भागातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांचा सर्वसमावेशक स्वतंत्र व्हॉट्सएप ग्रुप उपविभागीय अधिकारी स्तरावर तयार करून त्यावर वीजबिलाची संपूर्ण माहिती देऊन वीजविषयक समस्या, शंकांचे संपूर्ण समाधान करावे, त्यांचे सोबत वेबिनार आयोजित करून संवाद साधावा, असे त्यांनी सुचविले. 

विशेष शिबिरे, ग्राहक मेळावे घ्या 

‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार, शहरी भागात महत्त्वाच्या, मोक्याच्या ठिकाणी, तर ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या दिवशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजारासाठी येत असतात. तेथील नजीकच्या हॉल, कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करून ‘विशेष शिबिरे/ग्राहक मेळावे’ घेऊन वीज ग्राहकांचे समाधान करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. 
 


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...