नाशिकमध्ये स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद

Consumers' Great Response to Strawberry Festival in Nashik
Consumers' Great Response to Strawberry Festival in Nashik

नाशिक : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला दोन पैसे अधिक मिळावे व ग्राहकांना रासायनिक अवशेषमुक्त भाजीपाला मिळावा, यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या पुढाकाराने वशंकराचार्य न्यास यांच्या सहकार्याने ऑॅरगॅनिक बाजारचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्पादित होत असलेल्या स्ट्रॉबेरीची ग्राहकांना थेट विक्री करता यावी, यासाठी रविवारी (ता. २२) स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास शहरातील ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. 

या बाजारात  येवला, पेठ, सुरगाणा, चांदवड, त्र्यंबकेश्वर  आणि इगतपुरी  येथील  शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल थेट ग्राहकांसाठी  उपलब्ध  करून  दिला. उत्पादन खर्चावर आधारित दरात स्ट्रॉबेरीसह भाजीपाल्याची या वेळी विक्री करण्यात आली. प्रामुख्याने आदिवासी शेतकरी, महिला बचत गट व सेंद्रिय शेतीसाठी हा प्रयत्न स्तुत्य आहे, असे माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी फेस्टिव्हल प्रारंभ प्रसंगी सांगितले. 

फळांचे मूल्यवर्धन, रास्त दरात ग्राहकांना फळे व भाजीपाला विक्री व उत्पादकांसाठी विक्रीचे व्यासपीठ असा या उपक्रमाचा मुख्य भाग आहे. विविध हंगामानुसार फळे व भाजीपाला बाजार सुरू करण्याचे प्रयोजन असल्याची माहिती या वेळी हेमराज राजपुत यांनी दिली. फेस्टिव्हल प्रारंभ प्रसंगी  रोटरी  क्लब  ऑॅफ  नाशिकचे  अध्यक्ष ॲड.  मनीष  चिंधडे,  सचिव  डॉ. श्रीया  कुलकर्णी, रामनाथ जगताप, सोनाली जोशी, श्रीनंदन भालेराव, ओमप्रकाश रावत, रोटरी  ऑॅरगॅनिक  बाजारचे  चेअरमन  प्रा. तुषार  उगले,  रोटरी  कम्युनिटी  सर्व्हिसचे  डायरेक्टर ओमप्रकाश  रावत आदी उपस्थित  होते. फेस्टिवलमध्ये स्ट्रॉबेरीपासून सहज व सोप्या पद्धतीने बनविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे प्रात्यक्षिक शेफ रोहन जोशी यांनी दाखवले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com