agriculture news in marathi Contact the Department of Agriculture for crop insurance: Collector Dr. Vipin | Agrowon

पीकविम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा : जिल्हाधिकारी डॉ. विपिन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 2 डिसेंबर 2020

नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पूर्व सूचना देऊन शासनाच्या निकषांचे पालन केले. त्यांनी भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यास  तालुका कृषी कार्यालय किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले.

नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पूर्व सूचना देऊन शासनाच्या निकषांचे पालन केले. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यास त्यांनी तालुका कृषी कार्यालय किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले.

जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२० मध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पीक विम्याच्या निकषानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग, यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले होते.

ऑनलाइन पद्धतीने ईमेल, ॲप व टोल फ्री क्रमांकाद्वारे तसेच विमा कंपनी, कृषी विभाग व महसुल विभाग यांच्याकडे नुकसानीची पूर्व सूचना देण्याबाबत सांगितले होते. 

जिल्ह्यातील साधरणत: ६४ हजार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत कंपनीस पूर्वसूचना दिल्या. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचे काम संबंधित विमा कंपनीतर्फे चालु आहे.

ज्या शेतकऱ्यांचे पीक कापून शेतात ठेवल्यानंतर (काढणी पश्चात) पावसामुळे पिकाचे नुकसान झाले होते असे साधारणतः: १२ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पूर्व सूचना दिल्या होत्या. त्या शेतकऱ्यांचे देखील विमा कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्याचे काम सुरु आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीसाठी विमा कंपनीने ६४ कोटी ८९ लाखांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. 

उत्पादकतेची माहिती देणे सुरू

ज्या महसुल मंडळांमध्ये चालु वर्षाची  उत्पादकता उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी येते, तेथे त्या तुलनेत पीकविमा लागू होतो. ही आकडेवारी सर्व यंत्रणांकडून गोळा करून पीक विमा कंपनीस सादर करण्याचे काम सुरु आहे. ही आकडेवारी विमा कंपनीस पोहोचल्यानंतर एक महिन्यानंतर उत्पादकता कमी आलेल्या महसुल मंडळामध्ये पीकविमा मंजूर होईल.


इतर ताज्या घडामोडी
ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे...अमरावती : नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत...
गोरेवाडा प्राणिसंग्रहालय नामकरणाला विरोधनागपूर ः नागपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या...
औरंगाबाद विभागात उसाचे ४७ लाख टन गाळपऔरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर)...
वीज तोडल्यास गाठ आमच्याशी : कृती समितीकोल्हापूर ः कोरोना काळातील वीजबिले माफ करण्याची...
बीटी कापूस बियाण्यातील शेतकऱ्यांची...बुलडाणा ः कापूस उत्पादकांना कमी खर्चात अधिक...
अण्णांचे दिल्लीऐवजी राळेगणसिद्धीत आंदोलननगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी...
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
उत्पादनवाढीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरा...सोलापूर ः हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील...
गावठाण भूमापन कामाचे ड्रोनद्वारे...नांदेड : ‘‘भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण...
जमिनींचा लिलाव रोखा ; शेतकरी संघटनेची...नाशिक : शेतकऱ्यांचे चोहोबाजूंनी नुकसान झाले आहे....
सातारा जिल्ह्याची वीजबिल थकबाकी ४४...नगर ः खरीप हंगामात तयार झालेल्या तुरीला बाजारात...
शाश्‍वत उत्पन्नासाठी वनशेतीचे नियोजनवनशेतीपासून अन्नधान्याबरोबरच वृक्षापासून चारा,...
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
असे करा कोबीवर्गीय पिकांतील किडींचे...कोबीवर्गीय भाजीपाला पानकोबी व फुलकोबीवर मावा,...
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...