पीककर्ज अडचणींबाबत सहकार निबंधकांशी संपर्क करा :जिल्हाधिकारी शंभरकर

कर्ज हवे असणाऱ्या शेतकऱ्यांनी गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवांकडे मागणीचा अर्ज भरून द्यावा, त्यासाठी गट सचिव शेतकऱ्यांना मदत करतील. शेतकरी सोसायटीचा सभासद असेल आणि त्यास सोसायटीकडून पीक कर्ज मिळत नसेल, तर त्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज सोसायटी सचिवांकडे द्यावा. सचिव हे अर्ज संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठवतील. - कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
 Contact the Registrar of Co-operatives regarding crop loan issues: Collector Shambharkar
Contact the Registrar of Co-operatives regarding crop loan issues: Collector Shambharkar

सोलापूर  : ‘‘पीक कर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तालुक्याच्या सहकार निबंधक किंवा तहसीलदार कार्यालयास संपर्क करा,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. 

जिल्ह्यात पीक कर्जवाटप अतिशय सुलभरीत्या व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातील एक भाग म्हणून सहकार विभागाच्या यंत्रणेतून शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे शंभरकर यांनी  सांगितले. 

गर्दी टाळण्यासाठी पीक कर्ज मागणीचा अर्ज ऑनलाइनही करता येईल, अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या https://solapur.gov.in संकेतस्थळावरील ऑनलाइन अर्ज भरून पीक कर्ज मागणी नोंदणी करावी. त्याचबरोबर सहकार विभागाची यंत्रणाही या कामासाठी वापरण्याचे ठरविण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्जाद्वारे २५ कोटींचे कर्जवाटप

जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियानेही पुढाकार घेतला आहे. वेबसाइटद्वारे प्राप्त होणारे अर्ज छाननी करून संबंधित बँकांकडे प्रक्रियेसाठी पुढे पाठविण्यात येत आहेत. आतपर्यंत वेबसाइटवर ३६४९ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २२२५ अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली. यातील मंजूर झालेल्या अर्जदार शेतकऱ्यांना सुमारे २५ कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे. उर्वरित अर्जांवर लवकरच प्रक्रिया केली जाऊन त्यांनाही कर्ज मंजूर केले जाईल, अशी माहिती बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com