नगर जिल्ह्यातील ३७ गावांत ५८ पाणी नमुने दूषित

Contamination of 58 water samples in 37 villages in the Nagar district
Contamination of 58 water samples in 37 villages in the Nagar district

नगर ः जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील मागील महिन्यात पाण्याचे १६१३ नमुने तपासण्यात आले. त्यांत ३७ गावांतील ५८ नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून ही माहिती देण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमुने तपासले जातात. ज्या गावातील पाणी दूषित आढळल्यास त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. वर्षभरात जिल्हा परिषदेने २१ हजार ९९५ गावांतील पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यात ११८३ गावांतील पाणी दूषित होते. ज्या गावांतील स्रोतांचे पाणी दूषित आढळले, तेथे पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे. मागील महिन्यात तपासण्यात आलेल्या १६१३ पाणी नमुन्यांपैकी ५८ नमुने दूषित आढळले. या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी ४.५७ गेली आहे. संगमनेर तालुक्‍यात दूषित पाण्याचे प्रमाण जास्त असून या तालुक्‍यामध्ये अनुक्रमे १० गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. तर पारनेर, जामखेड तालुक्‍यातही प्रत्येकी ७ गावांना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे.

फेब्रुवारी महिन्यात १६१३ पाणी नमुने तपासण्यात आले. यामध्ये ५८ पाणी नमुने दूषित आढळले. ज्या पाण्याच्या स्रोतातील पाणी दूषित आढळले आहे, तेथील पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या.

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे पारनेर ः नांदूर पठार, रूई छत्रपती, भाळवणी. अकोले ः सांगवी, दगडवाडी धाबाडी, म्हाळुंगी, चदगीरवाडी, निळवंडे, शेलद. नगर ः टाकळी काझी, टाकळी खातगाव. संगमनेर ः खरशिंदे, खांबे, शिवलापूर, शेडगाव, खळी, मालुंजे, कोळवाडा, आंभोरे, पिंपरी, गुंजाळवाडी. शेवगाव ः भायेगाव, लाखेमळा, पाथर्डी ः सुसरे, देवराई. राहुरी ः दरडगाव, चांदेगाव. कोपरगाव ः शिंगणापूर. कर्जत ः मिरजगाव. नेवासे ः वंजारवाडी, शिरेगाव, सोनई, मोरेचिंचोरे, पानेगाव. राहाता ः रांजणखोल.

दूषित पाणी नमुने (कंसात तपासलेले नमुने) पारनेर : सात (१०३), अकोले : सहा (१४८), नगर : सहा (११५), संगमनेर : बारा (१५९), शेवगाव : दोन (७९), पाथर्डी : दोन (२१८), राहुरी : दोन (१२०), श्रीगोंदे : शून्य (१६२), कोपरगाव : दोन (१४०), कर्जत : सहा (५१), नेवासे : १२० (५), राहाता : एक (७७), श्रीरामपूर : शून्य (६९), जामखेड ः सात (५२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com