प्रयत्नात सातत्य ठेवल्यास निश्‍चित यश मिळेल

प्रयत्नात सातत्य ठेवल्यास निश्‍चित यश मिळेल
प्रयत्नात सातत्य ठेवल्यास निश्‍चित यश मिळेल

सातारा ः आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मेहनत, कष्ट व प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. यामध्ये अपयश जरी आले, तर डगमगून जावू नका. कारण प्रयत्नात सातत्य ठेवल्यास निश्‍चितपणे यश मिळत असते. असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. 

या वेळी उपाध्यक्ष जगदिश जगताप, संचालक दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, गिरीष पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग होनमाने, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, मनोज पाटील, जयाताई मदने, मुकेश पवार, सी. एन. मिसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. राजेंद्र सरकाळे पुढे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा. कृषी पदवीधरांची शेतकऱ्यांशी बांधिलकी आहे. कृषी पदवीधरांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी करावा. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून हे महाविद्यालय उभारून डॉ. सुरेश भोसले यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक शैक्षणिक दालन उभे केले आहे.’’ प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत बदल होत असून, आज आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. आपल्या महाविद्यालयास देशातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय बनवायचे आहे.  - डॉ. सुरेश भोसले, कारखान्याचे अध्यक्ष

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com