पाऊस पडेपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवा : छगन भुजबळ

पाऊस पडेपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवा : छगन भुजबळ
पाऊस पडेपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवा : छगन भुजबळ

नाशिक  : सध्याच्या दुष्काळातली दाहकता १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळापेक्षा वेगळी असून, पाणी नाही म्हणून चारा नाही. नजीकच्या काळात पाऊस सुरू झाला तरी जनावरांना चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्यांचे काम सुरू ठेवावे लागेल. त्यासाठी यंत्रणेने सकारात्मक राहण्याची आवश्यकता माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.  आमदार छगन भुजबळ यांनी नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथील अण्णासाहेब जाधव बहुउद्देशीय संस्थेच्या व नांदगाव शहरातील नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या छत्रपती जनसेवा मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना भेट देऊन पाहणी केली. या दोघाही संस्थेने जनावरांच्या पिण्याच्या पाण्यापासून चारा, आरोग्य विषय केलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी आमदार पंकज भुजबळ, अरुण थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी जगनराव सूर्यवंशी, मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, नगरसेवक वाल्मीक टिळेकर देवदत्त सोनवणे, कैलास पाटील आदी उपस्थित होते.

काबरा ट्रस्टच्या चारा छावणीने शेतकऱ्यांना दिलासा येवला : येथील स्व. रामनारायणजी काबरा चॅरिटेबल ट्रस्टने स्वखर्चाने चारा छावणी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. स्व. रामनारायणजी काबरा चॅरिटेबल ट्रस्ट व स्वर्गीय रामनारायणजी काबरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शासनाच्या अनुदानाशिवाय शहरातील अंगणगाव शिवारातील पांजरापोळ गोशाळा मैदान येथे चारा छावणी सुरू करण्यात आली. याचे उद्‍घाटन श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष ॲड. माणिकराव शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर, गोल्डमॅन पंकज पारख, काबरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम काबरा, उपाध्यक्ष महेश काबरा आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com