नाशिकमधील बाजार समित्यांचे कामकाज सुरू ठेवा; प्रशासनाच्या सूचना

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज काही ठिकाणी सुरू तर काही ठिकाणी बंद आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरू ठेवा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या.
Continue the functioning of market committees in Nashik; Administration instructions
Continue the functioning of market committees in Nashik; Administration instructions

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज काही ठिकाणी सुरू तर काही ठिकाणी बंद आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरू ठेवा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या.

बाजार समित्यांमधील कामकाज व लिलावाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवारी (ता. १६) बैठक पार पडली. यावेळी बाजार समित्यांच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेण्यासह कामात येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत बैठकीस खासदार डॉ. भारती पवार, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, चांदवड बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, सटाणा बाजार समिती सभापती संजय सोनवणे, मनमाड बाजार समितीचे सभापती किशोर लहाने, उमराने बाजार समितीचे प्रशासक व सचिव यांसह विविध बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सध्या अनेक शेतकऱ्यांचा माल काढून तयार आहे. या पार्श्वभूमीवर खरेदीचे व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी व त्या अनुषंगाने बाजार समिती पातळीवर काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. 

तसेच कांद्याच्या लिलावसंदर्भात खुला लिलाव, गोणी लिलाव व शिवार लिलाव असे तीन पर्याय सूचविण्यात आले आहेत. बाजार समितीने वैयक्तिक बंद पुकारू नये, व्यापार मर्यादित करा, त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून व्यवहार सुरू ठेवावे, असे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी बाजार समितीच्या प्रतिनिधींना सूचवले. 

बाजार समितीच्या कामकाजासंबंधी जिल्हास्तरावर हेल्पलाईन सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शेतमालाच्या विक्रीसंबंधी प्रश्न उद्भवू नये. बाजार समित्या बंद करून बसलो, तर मोठे नुकसान नुकसान होईल. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेऊन कामकाज सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. - डॉ. भारती पवार, खासदार   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com