Agriculture news in marathi Continue market committees in coordination | Agrowon

समन्वय ठेऊन बाजार समित्या सुरू ठेवा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 एप्रिल 2021

सुट्टीच्या टाळेबंदीमध्ये अत्यावश्‍यक सेवेत असल्याने शहरांमधील अन्नधान्य, फळे भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व बाजार समित्या आणि जिल्हा उपनिबंधकांना बाजार समित्या स्थानिक पोलिस आणि महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत सुरु करण्याचे आदेश संचालक सतीश सोनी यांनी (ता. १२) पुन्हा दिले आहेत. 

पुणे : सुट्टीच्या टाळेबंदीमध्ये अत्यावश्‍यक सेवेत असल्याने शहरांमधील अन्नधान्य, फळे भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व बाजार समित्या आणि जिल्हा उपनिबंधकांना बाजार समित्या स्थानिक पोलिस आणि महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत सुरु करण्याचे आदेश संचालक सतीश सोनी यांनी (ता. १२) पुन्हा दिले आहेत. 

पणन संचालक सोनी यांनी जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समित्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे,‘‘कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातील काही बाजार समित्या बंद ठेवल्या असल्याचे निदर्शनास आलेले आहे. कोरोनामुळे टाळेबंदीची परिस्थिती उद्भवली असली तरी अन्न, फळे भाजीपाला पुरवठा साखळी सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशा नुसार कोरोना फैलाव रोखण्यासाठीच्या आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून राज्यातील बाजार समित्या सुरू ठेवणे आवश्यक आहे. तसेच राज्य शासनाने देखील जारी केलेल्या प्रश्नांचे निरसन केलेले आहे. ते सोबत पाठवीत आहे. त्याची अंमलबजावणी करावी.’’ 

जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या जिल्हा व शहर पोलिस जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी समन्वय साधत सहकार्य घेऊन आपल्या जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू राहतील याकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. ज्या बाजार समित्यांवर शासकीय अधिकारी हा शासन नियुक्त प्रशासक किंवा सचिव म्हणून कार्यरत आहे अशा प्रशासक, सचिव यांनी विशेष लक्ष देऊन काळजी घेणे आवश्यक आहे . बाजार समित्यांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी शेतमालनिहाय चक्राकार पद्धतीने बाजार समित्या सुरु ठेवण्याच्या उपाययोजना कराव्यात, असे श्री. सोनी यांनी आदेशात म्हटले आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...
शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा...कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल...
पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
विमा कंपन्यांना आयुक्तांचा दणका पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत...