Agriculture news in marathi; Continued rains in Nashik district disrupted papaya cultivation | Agrowon

नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पपईच्या लागवडी बाधित

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

नाशिक  : गेल्या पंधरा दिवसांपासून कसमादे पट्ट्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. यात खरीप पिकांसह व इतर नगदी पिके नेस्तनाबूद झाली आहेत. या संकटात सुरवातीला द्राक्ष व डाळिंब बागांना फटका बसला होता. मात्र, देवळा तालुक्यातील पपईच्या लागवडी बाधित झाल्या असून झाडांनी माना टाकायला सुरवात झाली आहे. 

नाशिक  : गेल्या पंधरा दिवसांपासून कसमादे पट्ट्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. यात खरीप पिकांसह व इतर नगदी पिके नेस्तनाबूद झाली आहेत. या संकटात सुरवातीला द्राक्ष व डाळिंब बागांना फटका बसला होता. मात्र, देवळा तालुक्यातील पपईच्या लागवडी बाधित झाल्या असून झाडांनी माना टाकायला सुरवात झाली आहे. 

देवळा तालुक्यातील विठेवाडी परिसरात पपईचे पीक ही सततच्या पावसामुळे बाधित झाले आहे. येथील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पपईची लागवड केली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी चांगले दर मिळत असल्या कारणाने पपई उत्पादक समाधानी होते. परंतु, सुरवातीला झालेली अतिवृष्टी, परिसरात नद्यांना आलेला महापूर त्यामुळे पपई नदीत वाहून गेली होती. आता १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे इतर पिकांबरोबर पपईचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेले फळ खराब होत असून अतिप्रमाणात पाणी झाल्यामुळे पाणगळती व रोगांमुळे झाडे वाळून जात आहे. फळांना कीड लागल्याने सडवा होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे झाडांची फळे तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

शासनाने नुकसानभरपाई देण्यासाठी इतर फळबांगाबरोबर पपईचाही समावेश करण्यात यावा. एकरी १ लाख रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विठेवाडी येथील पपई उत्पादक दिनकर जाधव, रवींद्र बोरसे, निंबा निकम, माणिक निकम, काशिनाथ बोरसे आदींनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...