Agriculture news in marathi continuity disturb in the functioning of market committees in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांच्या कामकाजात धरसोड

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या नियोजनात समन्वय नाही. त्यामुळे त्या कधी सुरू, तर कधी बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बाजार समित्या सुरू ठेवा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तर, समित्यांनी बाजार बंद ठेवू नये, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात धरसोड सुरूच असल्याचे चित्र आहे. 

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या नियोजनात समन्वय नाही. त्यामुळे त्या कधी सुरू, तर कधी बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बाजार समित्या सुरू ठेवा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तर, समित्यांनी बाजार बंद ठेवू नये, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात धरसोड सुरूच असल्याचे चित्र आहे. 

‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवून बाजार समित्यांचे व्यवहार ठेवण्यास सांगण्यात आले होते. मात्र, या दरम्यान मजुरटंचाई, उपाययोजनांचा अभाव अशा अडचणी आल्या. त्यामुळे बाजार समित्या कधी सुरू, तर कधी बंद राहिल्याचे पाहायला मिळाले. या परिस्थितीत काही बाजार समित्या व व्यापाऱ्यांच्या कामकाजात सुसूत्रता आणून कामकाज करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला. तर, काही ठिकाणी ठोस निर्णय झाल्याने केंद्र सरकारच्या निकषांनुसार कामकाज सुरू ठेवण्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बाजार समित्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये काही ठिकाणी अजूनही धरसोड दिसून येत आहे. 

नांदगाव बाजार समितीत कांदा लिलावास ३०० वाहन मर्यादा आहे. मात्र, भाजीपाला लिलाव बंद आहेत. तर, चांदवड येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार येथील परिसर सील केला आहे. त्यामुळे कामकाज बंद असून मालेगाव येथेही हीच स्थिती आहे. 

बाजार सुरळीत राहण्यासाठी पिंपळगाव बाजार समिती व व्यापाऱ्यांनी गर्दी नियंत्रण करून कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर विक्रीचा निर्णय घेतला. त्यानुसार कामकाज सुरू झाले आहे. तर, अशाच पद्धतीने येवला बाजार समितीत शनिवार (ता.१८) पासून व्यापारी खळ्यांवर लिलाव सुरू होतील. नामपूर बाजार समितीनेही असाच निर्णय घेतला आहे. तर, लासलगाव बाजार समितीत गोणी पध्द्तीने कामकाज सुरू आहे. 

कामकाजात नियोजन करून काही बाजार समित्यांमध्ये पूर्वनोंदनी करून वाहने लिलावासाठी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदल्या दिवशी मोबाईलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. यामध्ये सटाणा बाजार समितीनेही ३०० वाहनांची मर्यादा घालून दिली आहे. नोंदणी झाल्यावर शेतकऱ्यांना मेसेज मिळेल. तो दाखवून प्रवेश दिला जात आहे. 

तर, देवळा येथेही ३०० वाहन मर्यादा घालून कामकाज सूरू आहे. सिन्नर बाजार समितीमध्ये शनिवारी व रविवारी थेट येऊन टोकन देऊन १५० वाहनांची मर्यादा दिली आहे. 

उमराणे येथे ग्रामस्थांचा विरोध 

येथील बाजार समिती प्रशासन कामकाज सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, येथील स्थानिक ग्रामस्थ त्यास विरोध करत आहेत. ‘कोरोना’बाधित परिसरातील कामगार गावात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरातील कांदा उत्पादकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...