Agriculture news in Marathi, Continuous rain in Ratanwadi, Ghatghar region | Agrowon

रतनवाडी, घाटघर भागांत सातत्याने पाऊस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जुलै 2019

नगर ः नगर जिल्ह्यामधील अकोला तालुक्याच्या पश्चिम भागात रतनवाडी, घाटघर, पांजरे, वाकी भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस टिकून आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत २४ तासांत रतनवाडी येथे १०७, घाटघरला १११, पांजरेला ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पश्चिम भागातील पावसामुळे भंडारदरा, मुळा धरणांत पाण्याची आवक होत आहे. 

आतापर्यंत भंडादरदा धरणात तीन टीएमसीच्या जवळपास पाणीसाठा झाला आहे. मुळा धरणानेही साडेपाच टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. नगर जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र पाऊस नाही. 

नगर ः नगर जिल्ह्यामधील अकोला तालुक्याच्या पश्चिम भागात रतनवाडी, घाटघर, पांजरे, वाकी भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस टिकून आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत २४ तासांत रतनवाडी येथे १०७, घाटघरला १११, पांजरेला ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पश्चिम भागातील पावसामुळे भंडारदरा, मुळा धरणांत पाण्याची आवक होत आहे. 

आतापर्यंत भंडादरदा धरणात तीन टीएमसीच्या जवळपास पाणीसाठा झाला आहे. मुळा धरणानेही साडेपाच टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. नगर जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र पाऊस नाही. 

नगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्याच्या पश्चिम भागातील कळुसबाई शिखर, हरिचंद्रगड परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदा मात्र पावसाळा सुरू झाला तरी, पंधरा दिवस उशिराने पावसाचे आगमन झाले. पावसाला उशीर होत असल्याने तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी चिंतेत होते. चार दिवसांपासून भंडारदरा व मुळा धरणांच्या पाणलोटात मात्र जोरदार पाऊस पडत आहे. 

संततधार व जोरदार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. मात्र, चांगल्या पावसाने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त केला जात आहे.

नगर जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पावसाळ्याचा महिना उलटून गेला मात्र अजूनही पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न कायम आहे.

मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत झालेला पाऊस ः घाटघर ः १११, रतनवाडी १०७, पांजरे ः ११८, वाकी ः १०२, भंडारदरा ः १०५, आढळा ः १३, निळवंडे ः १८, अकोले ः १२, कोतुळ ः ७.

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व...
पांढऱ्या सोन्याचे काळे वास्तवकेंद्र सरकारने जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरीप...
‘जीआय’ला प्रोत्साहन राज्यासाठी वरदानकेंद्र सरकारचा २०१९ चा अंतिम अर्थसंकल्प   ...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...
क्षारप्रतिकारक ऊस वाणावर होणार संशोधनपुणे  : भाभा अणुशक्ती केंद्र (बीआरसी) आणि...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे  : बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...