Agriculture news in Marathi Continuous rains in the dam area of ​​Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची संततधार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा आहे. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४२ मिलिमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा आहे. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४२ मिलिमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंत जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये जवळपास ९.५० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला असून एक जूनपासून एकूण ११४.१९ टीएमसी पाणीसाठा आहे. यामध्ये उजनी धरणातील पाण्याचा समावेश आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता. १४) दिवसभर पश्चिम पट्ट्यातील धरणक्षेत्रात हलका पाऊस चालू होता.

जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने सुरुवात केली आहे. पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांतही पावसाने चांगलीच सुरुवात केली आहे. त्यामुळे या पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले खळाळून वाहत होते. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास धरणांतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या खडकवासला, कळमोडी, वीर धरणांतून काही प्रमाणात डावा, उजवा कालवा व सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळत आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यातील बहुतांशी भागात पाऊस पडला. उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांतही अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे खरिपातील ज्वारी, तूर, मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, मका पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

शुक्रवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणातील पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः पानशेत १४२, वरसगाव १३४, मुळशी ११६, टेमघर ११०, गुंजवणी १००, वडिवळे ८०, नीरा देवघर ६८, भाटघर ५७, खडकवासला ४२, कळमोडी ४६, भामाआसखेड ४०, डिंभे, येडगाव ४७, चासकमान ३८, पवना ३९, पिंजळगाव जोगे ३५, आंध्रा ३३,  नाझेर २७, माणिकडोह २४, कासारसाई, वीर २२, वडज २०, उजनी १३.


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...