सततच्या पावसाचा सोयाबीन बीजोत्पादनाला तडाखा

काढणीला आणलेले पीक पावसामुळे खराब होत आहे. सोयाबीनचा दर्जा यामुळे खालावण्याची चिन्हे तयार झाल्याने पुढील हंगामासाठी बियाण्याचाही पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Continuous rains hit soybean seed production
Continuous rains hit soybean seed production

अकोला ः सतत ढगाळ वातावरण आणि संततधार पावसाने सोयाबीन उत्पादकांसमोर विचित्र पेच तयार झाला आहे. काढणीला आणलेले पीक पावसामुळे खराब होत आहे. सोयाबीनचा दर्जा यामुळे खालावण्याची चिन्हे तयार झाल्याने पुढील हंगामासाठी बियाण्याचाही पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

प्रामुख्याने सध्या सोयाबीनचे पीक काही ठिकाणी काढणीसाठी तयार झालेले आहे. तर काही भागांत हा हंगाम सुरू होणार आहे. राज्यात यंदा सर्वाधिक ४६ लाख हेक्टरवर लागवड झालेली आहे. तर वऱ्हाडात यंदा सोयाबीन ९ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरल्या गेली होती.  गेल्या काही वर्षांत शेतकरी कमी कालावधीच्या वाणाकडे वळालेले आहेत. हे वाण काढून रब्बीची पेरणी शेतकरी साधत असतात. मागील वर्षापासून मात्र लवकर येणारे वाण प्रामुख्याने पावसाच्या तडाख्यात सापडत आहेत. 

यंदाही असेच झालेले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाणी बाहेर निघालेले नाही. परिणामी, ओलाव्यामुळे झाड, शेंगावर बुरशी तयार होत आहे. सध्‍या काही भागांत सोयाबीनच्या शेंगा वाळलेल्या आहेत. या शेंगांमधूनच नव्हे तर हिरव्या शेंगातूनही कोंब अंकुरलेले दिसत आहेत. सोयाबीन पिकाचे किमान ५० टक्के नुकसान होण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. गेल्या हंगामातही पावसाने धुमाकूळ घातला होता.

सध्या जो पाऊस होत आहे तो आणखी दोन-तीन दिवस राहिला, तर आमच्या जिल्ह्यातील ५० टक्के सोयाबीन हातातून जाऊ शकते. आजच सोयाबीनच्या शेंगामधून कोंब आलेले दिसून येत आहेत. हिरव्या शेंगामधूनसुद्धा कोंब निघालेले आहेत. शेतकरी कंपन्यांना बीजोत्पादनात मोठा फटका बसू शकतो. पुढील हंगामात दर्जेदार बियाणे मिळवण्यातही अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  - पंजाबराव अवचार, अध्यक्ष, संत ज्ञानेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनी, किनखेडा, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com