विदर्भात संततधार पावसाने पूरस्थिती

विदर्भात त्यातही मुख्यत्वे पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्याच्या परिणामी प्रकल्पातील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेक भागात पूरस्थिती गंभीर झाली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
Continuous rains in Vidarbha
Continuous rains in Vidarbha

नागपूर : विदर्भात त्यातही मुख्यत्वे पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्याच्या परिणामी प्रकल्पातील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेक भागात पूरस्थिती गंभीर झाली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाची पाणी पातळी वाढली आहे. परिणामी या प्रकल्पाचे सहा ही दरवाजे प्रत्येकी १.०५ मीटरने उघडण्यात आले आहे. या धरणातून सध्या १०७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. बावनथडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बावनथडी प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पाचे चार दरवाजे ६० सेंटिमीटरने उघडण्यात आलेले आहे. या दरवाज्यातून ४०२ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यातील करधा येथील लहान पुलावरून पाणी वाहत आहे. परिणामी प्रशासनाने खबरदारी म्हणून पुलावरील वाहतूक बंद केली आहे. या भागात पोलिसांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये छोटे-मोठे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. गोंदिया जिल्ह्यात देखील अनेक गावांमध्ये पूरस्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला आणि खीरपुरी बांध या प्रकल्पांमध्ये पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. परिणामी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा नदी काठावरील गावांना दिला आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचीची नोंद झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात देखील काही प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नद्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली सुद्धा पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. निम्न वर्धा प्रकल्पाची पातळी देखील वाढल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com