Agriculture news in marathi Continuous rains in the western part of Nashik district | Page 3 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामध्ये सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात जोर दिसून आला. सोमवारी (ता.२१) मध्यरात्रीनंतर मंगळवार (ता. २२) दुपारपर्यंत धरणक्षेत्रात संततधार कायम आहे.

नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामध्ये सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात जोर दिसून आला. सोमवारी (ता.२१) मध्यरात्रीनंतर मंगळवार (ता. २२) दुपारपर्यंत धरणक्षेत्रात संततधार कायम आहे. त्यामुळे गंगापूर धरण समूहात पाणीसाठा वाढला आहे. तर मुसळधार पावसामुळे नांदगाव शहर व परिसरात पुन्हा जनजीवन विस्कळित झाल्याने मोठा फटका बसला. 

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून दुपारी १ वाजता एकूण ६ हजार क्यूसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला.

पेठ, सुरगाणा तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. दिंडोरी, चांदवड व नाशिक तालुक्याच्या विविध भागात पावसाचा जोर दुपारपर्यंत होता. येवला, निफाड, कळवण, सटाणा, देवळा, सिन्नर तालुक्यात ढगाळ वातावरण कायम होते. मात्र किरकोळ स्वरूपात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस झाला. 

नांदगावला दाणादाण 

मंगळवार (ता. २१) दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने नांदगाव शहर व परिसरात चांगलीच दाणादाण उडाली. नांदगाव महसूल मंडळात ८२ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या तेरा दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन कोलमडून पडले होते. बाजारपेठेत पाणी शिरल्याने छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे पुन्हा लेंडी नदीपात्रात पाणी भरून वाहिले. शहराच्या रेल्वे फाटकाबाहेरील येवला रोड, औरंगाबाद रोड भागातील जनतेचा शहराशी असलेला जनसंपर्क पुन्हा खंडित झाला. गांधीनगर येथील पुरात वाहून जाणाऱ्या अरुण साळवे या व्यक्तीला युवकांनी वाचविले.
 


इतर बातम्या
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू...अमरावती : सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना...
जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात धडधडू...जळगाव ः खानदेशात कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
सांगली जिल्ह्यातील थकबाकीमुक्तीत ५५...सांगली ः ‘‘कृषिपंपांच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
दोन लाख ९५ हजार टन खतांचे आवंटन मंजूरऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
दोन लाख ३८ हजार खातेदारांचे आधार...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
ग्रामबीजोत्पादनातून हरभरा, गहू...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
जुन्नर बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल...जुन्नर, जि. पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाच्या...
जळगाव जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना...जळगाव : जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत झालेल्या...
नगर जिल्ह्यात सव्वानऊ हजार शेतकऱ्यांचे...नगर : जिल्ह्यात तब्बल दोन हजार ६३५ शेतकऱ्यांनी...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...