agriculture news in Marathi continuously raining in Sindhudurg Maharashtra | Agrowon

सिंधुदुर्गात पाऊस सुरूच 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस सुरूच आहे. सोमवारी रात्री पावसाच्या सरी कोसळत होत्या. तर मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असून अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत.

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस सुरूच आहे. सोमवारी रात्री पावसाच्या सरी कोसळत होत्या. तर मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असून अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत. किनारपट्टीसह संपूर्ण जिल्ह्याला चक्रीवादळाच्या शक्यतेने सतर्कतेचा इशारा दिला असून एनडीआरएफची तुकडी तैनात ठेवण्यात आली आहे. 

सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. सुरूवातीला विजांच्या कडकडाटासह कोसळलेला पाऊस आता मान्सूनप्रमाणे कोसळत आहे. सोमवारी रात्रभर रिमझिम पाऊस तर कधी पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे हवेतील उष्मा नाहीसा झाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. 

हवामान खात्याने ३ जूनला चक्रीवादळाची शक्यता वर्तविल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छीमार बांधवांनी समुद्रात उतरू नये. याशिवाय आपआपल्या नौका किनाऱ्याला सुरक्षित स्थळी ठेवाव्यात अशा सूचना दिल्या आहेत. ज्यांची घरे मजबूत नसतील त्यांनी सुरक्षित स्थळी जावे.

घराच्या आजूबाजूला झाडे असतील तर त्यांनीही सुरक्षित ठिकाणी राहावे. यादिवशी विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, या कालावधीत वीज पुरवठा खंडीत होणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे आपआपल्या घरांमध्ये दिव्यांची व्यवस्था करावी, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...