सेंद्रीय आणि शाश्‍वत शेती विकासासाठी ‘पंदेकृवि’चा डच कंपनीशी करार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ५१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत विद्यापीठाने नेदरलँड येथील स्वालीडारीदयाद या संस्थेसोबत सेंद्रिय तथा शाश्‍वत शेतीच्या विकासासाठी सामंजस्य करार केला.
farm
farm

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ५१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत विद्यापीठाने नेदरलँड येथील स्वालीडारीदयाद या संस्थेसोबत सेंद्रिय तथा शाश्‍वत शेतीच्या विकासासाठी सामंजस्य करार केला.  ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते. संस्थेचे आशिया खंडाचे कार्यकारी संचालक डॉ. शताद्रु चटोपाध्याय, विद्यापिठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, कृषी अधिष्ठाता डॉ. एम. बी. नागदेवे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता  डॉ. एस. बी. वडतकर, कृषिविद्या विभाग प्रमुख डॉ. एन. डी. पार्लावार, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. ए. एन. पसलावार, संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. प्रशांत पस्तोर, प्रा. डॉ. नितीन कोंडे सहभागी होते.  ही संस्था १९६९ मध्ये स्थापन झाली असून नेदरलँडमध्ये अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, मध्य आणि पूर्व आफ्रिका, दक्षिण आफ्रिका येथे काम करीत आहे. सेंद्रिय आणि शाश्‍वत शेतीमधील संशोधन प्रशिक्षण विस्तार या संबंधित भारतातही संस्था काम करते. या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेट तथा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबत चर्चा केल्यानंतर संयुक्त संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण आणि विद्यार्थी व शास्त्रज्ञांनी देवाणघेवाण इत्यादी कार्यक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. डॉ. कोंडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

२० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोचणार या सामंजस्य कराराअंतर्गत विदर्भातील २० हजार शेतकऱ्यांना सेंद्रिय तसेच शाश्‍वत शेती व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान पोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्राथमिक काळात हवामान आधारित कृषी सल्ला प्रकल्पावर काम करण्यात येईल. जमीन, पीक व्यवस्थापन यांचा अभ्यास व विस्तारात्मक कार्यक्रम राबविला जाईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com