agriculture news in Marathi, control on American fall army worm Through the farmers awareness, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून अळीवर नियंत्रण मिळवणे झाले सुकर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या अनुषंगाने जिल्ह्यात उपाययोजना केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने जनजागृती, फिल्डवर भेटी देऊन सल्ला देण्याचे काम करण्यात आले. यामुळे अळीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता आल्याचा दावा बुलडाणा कृषी विभागाकडून केला जात आहे.  

कृषी विभागाने मक्यावरील लष्करी अळी संदर्भात नियंत्रणाकरिता अशा केल्या होत्या उपाययोजना

बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या अनुषंगाने जिल्ह्यात उपाययोजना केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने जनजागृती, फिल्डवर भेटी देऊन सल्ला देण्याचे काम करण्यात आले. यामुळे अळीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता आल्याचा दावा बुलडाणा कृषी विभागाकडून केला जात आहे.  

कृषी विभागाने मक्यावरील लष्करी अळी संदर्भात नियंत्रणाकरिता अशा केल्या होत्या उपाययोजना

 • क्रॉपसॅपअंतर्गत बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले व त्यामध्ये किडीची ओळख, तिचा जीवनक्रम याविषयी माहिती
 • क्रॉपसॅपअंतर्गत कृषीचे क्षेत्रीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या. 
 • त्यामध्ये कृषी सल्लावृत्ताचे (ॲडव्हायझरी) वाचन करण्यात आले. 
 • रावेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मक्याचे सर्वेक्षण करण्यात आले व त्यामध्ये शेतकऱ्यांना उपायोजना सांगण्यात आल्या.
 • क्रॉपसॅपअंतर्गत एम किसान पोर्टलवरून दर आठवड्याला उपविभागाअंतर्गत एक लाख पाच हजार ९७० शेतकऱ्यांना दर आठवड्याला मेसेज पाठविण्यात येत आहेत.
 • क्रॉपसॅप, आत्मा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, याअंतर्गत सर्व शेती शाळांमध्ये मक्यावरील लष्करी अळी व तिचे व्यवस्थापन या संदर्भाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानुसार शेतकऱ्यांनी फवारणीसुद्धा केली.
 • क्रॉपसॅपअंतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये मका पिकात अळीचे पतंग सामूहिकरित्या पकडण्यासाठी (मास ट्रॅपिंग) गावे निवड करण्यात आली आहेत. त्यामध्ये कामगंध सापळे, यामध्ये पकडण्यात आलेल्या पतंग संख्येनुसार सुद्धा सर्वेक्षण करून त्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येत आहेत.
 • आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेल्या गावांमध्ये शंभर टक्के अनुदानावर रासायनिक कीटकनाशकचा पुरवठा करण्यात येत आहे 
 • याव्यतिरिक्त घडीपत्रिका, पाम्प्लेट, पोस्टर, गाव बैठका, गावांमध्ये ऑटो फिरवून जिंगलच्या माध्यमातून लष्करी अळी संदर्भामध्ये जनजागृती करून उपायोजना करण्यात आलेल्या आहेत.

आगामी रब्बीत मका घेणाऱ्या शेतकऱ्यांना उपायोजना व काळजी घेण्याचे आवाहन 

 • खरीप हंगामात मका घेतलेला असेल तर त्या शेतात रब्बीमध्ये मका घेऊ नये.
 • रब्बीमध्ये मका पेरत असताना पट्टा पद्धतीचा अवलंब करावा.
 • मका बियाणाला शिफारस केलेल्या कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
 • पिकामध्ये कामगंध सापळे लावावेत.
 • सुरवातीच्या एक ते दीड महिन्यांमध्ये निंबोळी अर्क फवारणी करावी.
 • पिकामध्ये नियमित सर्वेक्षण करावे.
 • कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.

इतर अॅग्रो विशेष
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून...औरंगाबाद ः कृषी निविष्ठा  विक्रेत्यांच्या...