agriculture news in Marathi, control on american fall armyworm by advance technology and accurate policies, pune, maharashtra | Agrowon

आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण शक्य
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी, अमेरिकी देशांमध्ये अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी कार्यक्रम राबवले. यात गंध सापळे नेटवर्क, डिजिटल मॅप्स, माहिती, तंत्रज्ञानाचा प्रसार आदींचा वापर यशस्वी ठरला. चीननेदेखील जैविक प्रयोगशाळा उभारून नियंत्रणास मोठी चालना दिली. तर तैवान, श्रीलंका देशातील सरकारने देखील कडक धोरणे राबवून तातडीची व काटेकोर पावले उचलल्याने किडीच्या आक्रमणाला रोखणे शक्य केले आहे.  

पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी, अमेरिकी देशांमध्ये अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी कार्यक्रम राबवले. यात गंध सापळे नेटवर्क, डिजिटल मॅप्स, माहिती, तंत्रज्ञानाचा प्रसार आदींचा वापर यशस्वी ठरला. चीननेदेखील जैविक प्रयोगशाळा उभारून नियंत्रणास मोठी चालना दिली. तर तैवान, श्रीलंका देशातील सरकारने देखील कडक धोरणे राबवून तातडीची व काटेकोर पावले उचलल्याने किडीच्या आक्रमणाला रोखणे शक्य केले आहे.  

अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणाच्या अनुषंगाने जगभरात राबवलेल्या व सुरू असलेल्या कार्यक्रमाविषयी  सिक्थ ग्रेन या कंपनीचे ॲग्रॉनॉमिस्ट डॉ. अंकुश चोरमुले यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानुसार भारतासाठी लष्करी अळी नवी असली तरी जगभरातील संशोधकांसाठी ती अनेक वर्षांपासूनची डोकेदुखी आहे. अमेरिकेत कित्येक दशकापासून मका पिकातील ती समस्या आहे. अमेरिका खंडाबाहेर या किडीची सर्वप्रथम नोंद २०१६ मध्ये नायजेरिया या आफ्रिकी देशात झाली. तर भारतात या अळीची नोंद जून २०१८ मध्ये झाली. आजमितीला जवळपास सर्वच आशियाई देशांत या किडीची नोंद झाली आहे. 

डॉ. चोरमुले म्हणतात, की आफ्रिकी देशात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तेथील बहुसंख्य लोकांचे ते अन्न आहे. सन २०१६-१७ च्या आकडेवारीनुसार तब्बल ४० दशलक्ष लोकांना या किडीचा फटका बसला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी एफएओ, सिमीट, कॅबी आदी जागतिक संस्था आफ्रिकन देशांत कार्यरत आहेत. एफएओ या संस्थेने आफ्रिकी देशात ‘अँड्रॉइड’ ॲप’ ची निर्मिती केली असून त्या पद्वारे लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची नोंद केली जाते. यामध्ये त्यांनी कामगंध सापळ्यांचे ‘नेटवर्क’ उभारले  आहे. त्याद्वारे सापळ्यातील पतंगाची संख्या मोजली जाते. त्यानुसार किडीच्या आगाऊ प्रादुर्भावाविषयी त्या त्या भागातील शेतकऱ्यांना मोबाइल ॲप द्वारे माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे किडीच्या प्रादुर्भावाचा डिजिटल मॅप’ ही तयार केला जातो. तो सर्व संशोधक व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जातो. 

 जैविक घटकांचा वापर 
  डॉ. चोरमुले यांनी दिलेल्या माहितीनुसार मित्रकीटक, जैविक कीटकनाशकांमध्ये एनपीव्ही, परोपजीवी सूत्रकृमी, वनस्पतिजन्य कीटकनाशके यांचा वापर अग्रस्थानी करण्यात आला. लहान शेतकऱ्यांसाठी कमी खर्चातील पद्धती आफ्रिकी शेतकऱ्यांनी वापरल्या. त्यामध्ये ‘पुश-पूल’ आंतरपीक पद्धतींचा प्रामुख्याने समावेश होतो. या पद्धतीत किडीला परावर्तित करणाऱ्या डेस्मोडियम या आंतरपिकाची निवड करण्यात आली. संपूर्ण पिकाभोवती ‘बॉर्डर लाइन’ म्हणून किडीला आकर्षित करणाऱ्या नेपियर गवताची लागवड करण्यात आली. शास्त्रीय सर्वेक्षणात दिसून आले आहे की पुश-पूल पद्धतीमध्ये ८६ टक्के किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन अन्य क्षेत्राच्या तुलनेत २.७ पटीने मका उत्पादनात वाढ झाली. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी साखरेचे पाणी मक्यावर फवारणे, तसेच मक्याच्या पोंग्यात राख टाकणे असा सोप्या, कमी खर्चिक पद्धती वापरून आपल्यापरीने किडीचे नियंत्रण करण्यात यश मिळवले. 

तैवानने उचलली कडक पावले  
तैवान या मका उत्पादक देशात लष्करी अळीचा जून २०१९ रोजी प्रथम प्रादुर्भाव दिसून आला. तैवान प्रशासनाने या विषयाला प्राधान्य देऊन किडीचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न चालू केले. प्रादुर्भाव थांबवण्यासाठी त्वरित ११ कीटकनाशकांची शिफारस करण्यात आली. त्याचसोबत विमानतळ, सागरी बंदरे आदी ठिकाणी सुमारे ५०० कामगंध सापळे लावण्यात आले. जेणे करून किडीच्या प्रसार कुठून कसा होतो, याबाबत अद्ययावत माहिती मिळणे शक्य झाले.

आढळ सांगा, इमान पटकवा 
डॉ. चोरमुले म्हणाले की तैवान देशात विशेष ‘टास्क फोर्स’ (कृती दल) तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून जवळपास २८ शेतांमधील मका उपटून जाळून टाकण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे तैवान ॲग्रिकल्चर कौन्सिलमार्फत १९ जून २०१९ पर्यंत प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रात या अळीची नोंद करणाऱ्या शेतकऱ्याला २२ हजार रुपयांचे (भारतीय चलनात) इनाम म्हणून देण्यात येत आहेत. 

श्रीलंकेत कृषी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द 
या अळीचा प्रादुर्भाव श्रीलंकेमध्ये मागील ऑक्टोबरमध्ये दिसून आला. जवळपास १० हजार मका उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. किडीचा पुढील होणार प्रसार रोखण्यासाठी श्रीलंकेच्या कृषी मंत्रालयाने पाच कीटकनाशकांची शिफारस केली आहेत. तेथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन किडीच्या व्यवस्थापनासाठी जनजागृती केली. तातडीच्या उपायांसाठी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या रजा, शासकीय सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. 

अंदाजपत्रकात तरतूद 
अळीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी १५,६३३ रुपये भारतीय रुपये) भरपाई देण्यात आली. श्रीलंकन सरकारने  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून देण्यासाठी नऊ कोटी ८३ लाख भारतीय रुपये) इतके अंदाजपत्रक राखीव ठेवले आले आहे. श्रीलंकेतील विरोधी पक्षांनीही हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवून सरकारला धारेवर धरले. 

भारतातील कार्य 

 •  डॉ. चोरमुले यांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबादस्थित खासगी कंपनीकडून फेरोमोन टॅब्लेटसची निर्मिती
 •  त्याचा वापर कामगंध सापळ्यासारखा.
 •  याच कंपनीद्वारे फेरोमोन ट्रॅप्सची निर्मिती. 
 •  कामगंध तंत्रज्ञानातील पुढची पायरी म्हणून सप्लॅट (Specialized pheromone and lure application technology) तंत्रज्ञानावर संशोधन सुरू. यामध्ये कामगंध पेस्ट स्वरूपात पिकावर वापरला जातो.
 •  भारतात सिक्थ ग्रेन या संस्थेमार्फत किडीच्या आगाऊ माहितीसाठी प्रकल्प
 •  यात कामगंध सापळ्यांचा तसेच किडीच्या प्रादुर्भावाच्या माहितीचा वापर करून आगाऊ सूचना देणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येत आहे. 
 •  कीटकनाशकांबाबतही खाजगी कंपन्यांत संशोधन सुरू

चीनने उभारली प्रयोगशाळा 

 •  आशियाई देशांचा विचार केल्यास चीन, श्रीलंका आणि तैवान या देशांतही लष्करी अळीच्या नियंत्रणाचे शर्थीचे प्रयत्न 
 •  चीनमध्ये सुरवातीला कीटकनाशकांचा वापर. नंतर जैविक पद्धतींचा वापर करण्यावर भर
 •  नैसर्गिक शत्रू स्टिंक बगमुळे लष्करी अळीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होताना संशोधकांना आढळले. 
 •  एक बग एका दिवसात जवळपास ४१ अळ्यांना अर्धमेले करून सोडतो. या अळीच्या विरोधात लढण्यासाठी चीनच्या पीक संरक्षण संस्थेकडून स्टिंक बगचे उत्पादन करणाऱ्या प्रयोगशाळेची  निर्मिती
 •  त्या आधारे एका वर्षात एक कोटी संख्येने त्यांची निर्मिती प्रयोगशाळेत होणार 
 •  लष्करी अळी प्रादुर्भावित क्षेत्रात त्यांचे प्रसारण होणार 

जागरूकतेमुळेच उपाय ठरले यशस्वी 

 •  आफ्रिकी देशांमध्ये कीड नवी असल्याने अमेरिकेत करण्यात आलेल्या यशस्वी उपायांचा अवलंब
 •  त्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश
 •  पीक परिस्थितीवर वेळोवेळी लक्ष ठेवून प्रादुर्भावासाठी पिकाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतींचा उपयोग 
 •  सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर. त्यामुळे योग्य वेळी नियंत्रण करण्यात शेतकरी यशस्वी 
 •  लष्करी अळीचा प्रादुर्भाव किती झाला, तो कसा मोजायचा या बाबत पत्रके, वृत्तपत्रे, व्हिडिओ यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांत जागरूकता
 •  किडीच्या प्रादुर्भावाची नोंद करण्यासाठी शास्त्रीय पद्धत व त्यावरून आर्थिक नुकसान संकेत पातळी कशी ठरवावी या बाबत शेतकऱ्यांना सरकारी यंत्रणांकडून मार्गदर्शन 
 •  त्यामुळे कीटकनाशकांचा वापर गरजेनुसार. त्यामुळे किडींमध्ये येणारी प्रतिकारक्षमताही कमी होण्यास मदत 
   

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...