Agriculture news in marathi control and management of soybean steam borer | Page 2 ||| Agrowon

सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

डॉ. प्रमोद मगर, डॉ. एस. यू. नेमाडे
शुक्रवार, 10 जुलै 2020

यवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळत आहे. प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेमध्ये म्हणजेच पीक १५ ते २५ दिवसांचे असताना झाल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते. अगदी दुबार पेरणीचे संकटही ओढवू शकते.
 

यवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळत आहे. राज्यामध्ये अन्य ठिकाणीही या किडीचा प्रादुर्भाव होताना दिसतो. सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेमध्ये म्हणजेच पीक १५ ते २५ दिवसांचे असताना झाल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते. अगदी दुबार पेरणीचे संकटही ओढवू शकते.

सोयाबीनमध्ये पाने पिवळे पडण्याची विविध कारणे आहेत. झिंक किंवा लोह अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा तणनाशकाचा वापर झाला असल्यासही असे घडू शकते. मुख्य म्हणजे रसायनांच्या समंजस फवारण्या घ्याव्यात. खोडमाशीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर (१० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त) आढळल्यास शिफारशीत साधनांचा योग्य वापर करून सुरक्षित फवारणी करावी.

खोडमाशी (Melanagromyza sojae)

 • अंडी, अळी, कोष आणि प्रौढ अशा चार अवस्था
 • प्रौढ माशी आकाराने लहान, काळसर आणि चमकदार असून २ मि.मी. लांब
 • संपूर्ण आयुष्यक्रमामध्ये ७० ते ८० अंडी घालते.
 • अंड्यातून निघालेली पाय नसलेली २-४ मिमी लांब अळी प्रथम सोयाबीनची पाने पोखरून नंतर पानाच्या देठातून मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते.
 • प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते. परिणामी, पुनः पेरणी करण्यास भाग पडते किंवा उत्पादनात लक्षणीय घट येते. मोठ्या झाडांवर प्रादुर्भाव झाल्यास प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते.
 • अळी आणि कोषावस्था फांद्यात किंवा खोडातच पूर्ण
 • प्रादुर्भावग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. उत्पादनात १६ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येते.

नियंत्रण

 • प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या आणि पानाच्या देठाचा अळीसह नायनाट करावा.
 • निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंब आधारीत कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी.
 • आर्थिक नुकसानीची पातळी (सोयाबीनची १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) ओलांडल्यास खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. पाण्याचा सामू ६ ते ७ दरम्यान ठेवावा.

फवारणी - (प्रति लिटर पाणी)

 • इथिऑन (५० इसी) १.५ ते ३ मिलि किंवा
 • इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ०.६७ मिलि किंवा
 • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा
 • थायामेमिथोक्झाम (१२.६%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ % झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि.
 • (टीप - वरील कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे.)

संपर्क - डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५
(विषय विशेषज्ञ- कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...