agriculture news in marathi Control of animal parasites is important | Agrowon

जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण महत्वाचे...

डॉ.संजय लंबाते, डॉ. गुणाजी यादव
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे नवीन कालवडी, पारड्या, बकरे, करडे यांची वाढ व्यवस्थित होत नाही.जनावरांची भूक मंदावून उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते.

सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे नवीन कालवडी, पारड्या, बकरे, करडे यांची वाढ व्यवस्थित होत नाही.जनावरांची भूक मंदावून उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते.  जनावर व्यवस्थित माजावर येत नाही.  हे लक्षात घेऊन तातडीने उपचार करावेत.

जनावरांच्या आहारातील पोषण मुल्यापैकी २० ते ३० टक्यांपर्यंत सत्त्व परोपजीवी खात असल्याने पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. जंताचे प्रमाण कमी असताना विशेष लक्षण न दिसल्याने होणारे नुकसान जास्त असते. कारण प्रथम दर्शनी जनावर निरोगी दिसते. असे हे नुकसानकारक परोपजीवी आंत्र व बाह्य दोन प्रकारचे असतात. 

 • आंत्र परोपजीवीमध्ये गोल कृमी, चपटे कृमी व पर्णाकृती असे तीन उप प्रकारात आढळतात.
 • बाह्य परोपजीवीमध्ये उवा, गोचीड, लिखा, गोमाशी, डास यांचा समावेश होतो.
 • एकपेशीय परोपजीवी हा सुद्धा एक नुकसान कारक प्रकार आढळून आहे.  

जनावरांमधील बाह्य परोपजीवी 

 • जनावरांमध्ये  आढळणाऱ्या विविध परजीवींपैकी गोचीड हा एक महत्त्वाचा परजीवी आहे. जनावरांत रक्त शोषण करण्याबरोबर जीवघेणे आजार पसरविण्याचे काम गोचीड करतात.
 • एक गोचीड साधारण १ ते २ मिली रक्त शोषण करते. त्यामुळे रक्तक्षय  होतो. गोचीड चावल्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा होतात, त्यामुळे त्वचारोग होण्याची संभावना असते. 
 • गोचीड ताप हा एक भयंकर आजार पसरतो. हा एक जीवघेणा आजार असून जनावराची अपरिमित हानी करतो. 
 • गोचिडनाशकांचा वापर पशूतज्ज्ञांच्या सल्यानेच करावा. गोचीड निर्मुलन कार्यक्रम हाती घेताना एकाच वेळी संपूर्ण गोठ्याचे गोचीड निर्मुलन करावे.औषध योग्य मात्रेत वापरावे
 • जनावराच्या अंगावरील गोचिडांपेक्षा जास्त गोचीड गोठ्यात सापडत असल्याने गोठ्यातही औषध फवारणी करावी. गोठ्यात औषध फवारताना मात्रा दुप्पट करावी.
 • गोचिडाच्या अंडी अवस्थेवर औषधांचा परिणाम होत नसल्याने २१ ते २५ दिवसाच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी. औषध फवारणी वारा शांत असताना करावी.
 • गोचिडनाशक चारा, पाणी यावर उडणार नाही याची खात्री करावी. जनावर गोचिडनाशक चाटणार नाही, या करिता फवारणी पूर्वी पाणी पाजावे.
 • गोचिडनाशक फवारणी करणाऱ्या व्यक्तीने योग्य खबरदारी घ्यावी. 
 • उदा. फवारणी करताना औषध तोंडात जाणार नाही याची काळजी घ्यावी. फवारणी नंतर साबणाने स्वच्छ आंघोळ करावी.

परोपजीवींमुळे होणारे नुकसान 

 • नवीन कालवडी, पारड्या, बकरे, करडे यांची वाढ व्यवस्थित होत नाही.
 • जनावरांची भूक मंदावून उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते. 
 • जनावर व्यवस्थित माजावर येत नाही.  रोग प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होऊन जनावर कायम आजारी पडते.
 • लसीकरणाचा योग्य परिणाम दिसत नाही. जनावराचे  पचन बिघडून शेण पातळ होणे, शेणाचा वास येणे, शेणात आव पडणे अशी लक्षणे दिसून येतात. 
 • जनावराच्या त्वचेची  चमक कमी होऊन केस राठ होतात. 
 • वाढीच्या वयातील कालवडी, पारडी व गोऱ्हे यांचे पोट ढेबरे होते. त्यांचे  वजन वाढ योग्य प्रमाणात होत नाही.
 • जनावर गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. दूध उत्पादनात घट येते. 

उपाययोजना 

 • सर्वसाधारणपणे वर्षातून तीन ते चार वेळा जंत निर्मुलन करावे. बंदिस्त किंवा एकाच जागी असणाऱ्या जनावरांकरिता तीन वेळा आणि चरावयास जाणाऱ्या जनावरांकरिता चार वेळा जंत निर्मुलन करणे गरजेचे असते. 
 • ऋतू बदलावेळी म्हणजे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर हिवाळा संपताना आणि  गरज भासल्यास पावसाळ्याच्या मध्यावर जंत निर्मुलन कार्यक्रम करणे गरजेचे असते. 
 • वाढीच्या वासरांमध्ये योग्य प्रकारे जंत निर्मुलन कार्यक्रम केल्यास खूपच सकारात्मक परिणाम दिसून येतात. अशा बाबींमध्ये १२ ते १३ महिने वयाची कालवड लागवड योग्य म्हणजे २५० किलो वजनाची झाल्याची उदाहरणे दिसून आलेली आहेत. 
 • जंत निर्मूलनाकरिता शिफारशीत औषधांचा वापर करावा.

जंत निर्मुलन करताना 

 • जंत निर्मुलन करताना काळजी घेणे गरजेचे असते.
 • सर्व जनावरांना एकाच वेळी जंत निर्मुलन करावे.
 • गाभण जनावरांना पशूतज्ज्ञांच्या सल्यानेच उपचार करावेत. 
 • औषध योग्य मात्रेतच द्यावे, त्याकरिता वेष्टनावरील सूचना पाळाव्यात. जास्त मात्रा अपायकारक तर कमी मात्रा योग्य परिणाम कारक दिसून येत नाही.
 • प्रत्येक वेळी औषध बदलून द्यावे. म्हणजे जंतामध्ये औषधी प्रतिरोधशक्ती विकसित होणार नाही.
 • औषध सकाळी चारा देण्यापूर्वी उपाशी पोटी दिल्यास परीणामकता वाढते.
 • जास्त प्रादुर्भाव असल्यास पंधरा दिवसांनी पुन्हा औषध पाजावे. 
 • लसीकरण करण्यापूर्वी जंत निर्मुलन केल्यास लसीची परिणामकता वाढते.

संपर्क- डॉ. गुणाजी यादव, ८७६६८७५५४६
(पशुवैद्यकीय शरीररचना शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय , शिरवळ,जि.सातारा)


इतर कृषिपूरक
शाश्‍वत भविष्यासाठी मृदा संवर्धनाकडे...मृदा दिन या संकल्पनेचे एक प्रमुख उद्‌गाते व...
गुणवंत मेंढी पैदाशीसाठी नर, मादीची निवडमेंढ्यांमध्ये निवड पद्धतीने करावयाच्या आनुवंशिक...
तंत्र दर्जेदार मुरघास निर्मितीचेमुरघास तयार करताना एकदल चारा आणि द्विदल चारा...
दूध संकलन केंद्रावर घ्यावयाची दक्षतादूध संकलन केंद्र स्वच्छ आणि हवेशीर असावे. जमिनीवर...
स्वच्छ, सुरक्षित दूध उत्पादनाचे तंत्रअसुरक्षित दुधापासून क्षय, विषमज्वर, अतिसार, कॉलरा...
औषधी अळिंबीचे आहारातील महत्त्वअळिंबीमध्ये मॉइश्‍चरायझिंग गुणधर्म असतात. हे...
शेळ्या, मेंढ्यांचे हिवाळ्यातील संगोपनशेळी-मेंढीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू...
जनावरांतील विषाणूजन्य आजार ः तिवातिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक...
कोणत्या गुणधर्माच्या पीकजातींची पैदास...एखाद्या पिकातील योग्य ते गुणधर्म पुढील पिढीमध्ये...
थंडीमध्ये द्या जनावरांना पोषक आहार हिवाळ्यात जनावरांना शारीरिक तापमान संतुलित...
लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी लसीकरण हाच...लाळ्या खुरकूत हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्याचा...
चिंचेपासून जॅम, जेली, स्क्वॅशमहाराष्ट्रात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
कासदाहाकडे नको दुर्लक्ष... कासदाहाचा प्रसार दूषित पाणी, दूषित उपकरणे तसेच...
जनावरांतील पोटाचे आजार कसे ओळखाल?जनावरांना रवंथ करण्यासाठी दिवसातून किमान ८-१०...
नवीन प्राणिजन्य आजार ः क्रिमियन काँगो...क्रिमियन काँगो हिमोरेजिक फीवर या आजाराचा प्रसार...
ओळख अळिंबी उत्पादनाची...अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक...
काळपुळी आजाराबाबत दक्ष राहा...साधारणपणे २ ते ३ तास आधी निरोगी दिसणाऱ्या...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
जनावरांना द्या संतुलित आहारगाई, म्हशींसाठी, संतुलित आहार नियोजन केल्यास...
अळिंबी उत्पादनात मोठी संधी अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक...