agriculture news in marathi control of foot and mouth disease in cattle | Agrowon

लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रण

डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. सुधाकर आवंडकर
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

लाळ्या खुरकूत आजारामुळे जनावराच्या तोंडातून सतत लाळ गळते. वैरण खाण्याचे प्रमाण कमी होते. तोंडात फोड व अल्सर आल्यामुळे वैरण अजिबात खात नाहीत. लसीकरण हाच या आजाराच्या नियंत्रणाचा योग्य पर्याय आहे.
 

लाळ्या खुरकूत आजारामुळे जनावराच्या तोंडातून सतत लाळ गळते. वैरण खाण्याचे प्रमाण कमी होते. तोंडात फोड व अल्सर आल्यामुळे वैरण अजिबात खात नाहीत. लसीकरण हाच या आजाराच्या नियंत्रणाचा योग्य पर्याय आहे.

लाळ्या खुरकूत आजार जनावरांतील संसर्गजन्य आजार आहे. आजाराचा  प्रादुर्भाव हिवाळ्याच्या शेवटी व उन्हाळ्याच्या सुरवातीस जास्त प्रमाणात दिसून येतो. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, उंट, वराह, मिथुन या सारख्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव दिसतो. परदेशी व संकरित जनावरांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. पावसाळ्याच्या शेवटी आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे असते.

आजाराचे कारण 
आजार पिकोर्ना विषाणूमुळे होतो. संपूर्ण जगात या विषाणूच्या सात प्रजाती (ओ, ए, सी, आशिया-१, स्याट-१, स्याट-२ व  स्याट-३) आहेत. यापैकी ओ, ए आणि आशिया-१ या प्रजाती भारतातील लाळ्या खुरकूत आजाराच्या प्रादुर्भावास कारणीभूत आहेत.

 प्रसार 

 • आजारी जनावराच्या थेट संपर्कात निरोगी जनावर आल्यामुळे होतो. 
 • दूषित खाद्य, पाणी, हवेद्वारे, यांत्रिक प्रसारक (उदा. वाहने, उपकरणे, कपडे इ.) आणि जनावरांच्या लैंगिक संबंधातून होतो. 
 • विषाणू गोठवलेले मांस, लीम्फ  गाठी, खारवलेले मांस आणि पाश्‍चरायजझेशन न केलेल्या दुग्धजन्य पदार्थामध्ये दीर्घकाळ जिवंत राहू शकतात.

लक्षणे 

 • उच्च ताप (१०४-१०६ अंश फॅरानाईट)  २४ ते ४८ तास पर्यंत राहू शकतो.
 • तोंडातून सतत लाळ गळते. वैरण खाण्याचे प्रमाण कमी होते. तोंडात फोड व अल्सर आल्यामुळे वैरण अजिबात खात नाहीत.
 • ताप असल्यास भूक मंदावते.
 • दुग्धोत्पादनात घट दिसते. ही घट एकूण दूध उत्पादनाच्या १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. ही तूट आजार बरा झाल्यानंतर सुद्धा भरून येत नाही. 
 • पायांच्या खुराच्या आतील त्वचेवर व सांध्यावर फोड आणि अल्सर येतात, त्यामुळे बाधित जनावरे लंगडतात.
 • वयस्क जनावरांमध्ये मरतुकीचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र वासरांमध्ये मरतुक जास्त प्रमाणात दिसून येते.कमी वयाच्या वासरांमध्ये हृदय विकृती होऊन बळी पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. 
 • आजारातून बरे झाल्यावरही आजारी जनावर पुढील २-३ वर्ष या विषाणूचे वाहक राहू शकते. 
 • आजारी जनावरामध्ये गर्भपात, कासदाह, फुफ्फुसदाह, रक्तक्षय, खुरामध्ये व्यंग निर्माण होणे, शरीरावरील केसांची अनियमित व अस्ताव्यस्त वाढ होणे, धाप लागते. 

निदान व उपचार 

 • निदान लक्षणे तसेच रक्तजल चाचण्या व पीसीआर या पद्धतीने करता येते.
 • आजारावर कोणत्याही प्रकारचे विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. मात्र आजारी जनावरांना नियमित प्रथमोपचार करणे फायदेशीर ठरते.
 • १ टक्के पोट्यॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने  तोंड व खुरांतील जखमा धुवून घ्याव्यात. 
 • जखमांवर माशा बसून अंडी घालू नये किंवा जंतू संसर्ग होऊ नये म्हणून माशा परावर्तित करणारे प्रतिजैविक मलम लावावे. जखमांवर बोरीक पावडर व ग्लिसरीन याची पेस्ट करून लावावी. 
 • उपचारासाठी नोंदणीकृत पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.

प्रतिबंधात्मक उपाय 

 • आजारी जनावराचे तत्काळ विलगीकरण करावे.
 • दूषित वैरण व आजारी जनावराखाली अंथरलेला पाला जाळून टाकावा.
 • गोठ्याचे २ टक्के कॉस्टिक सोडा किंवा फॉरमॅलीन द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे.
 • गोठ्यात उपयोगात येणारी उपकरणे, अवजारे, मजुरांचे कपड्यांचे  निर्जंतुकीकरण करावे.
 • आजारी जनावरास निरोगी जनावरांसोबत बाहेर चरावयास सोडू नये. 
 • आजारी जनावरांना सामुदायिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास नेऊ नये.
 • वासरांना आजारी मातेपासून दूर ठेवावे.
 • सामुदायिक पद्धतीने लसीकरण, जनावरांच्या आंतर-राज्यीय व आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर निर्बंध, आजारी जनावरांचे विलगीकरण, शीघ्र निदान पद्धती, निर्जंतुकीकरण व आजाराविषयी सार्वजनिक जागरूकता याद्वारे प्रतिबंध करण्यास मदत होते.

लसीकरण

 • सामुदायिक लसीकरण करणे हा आजारावरील सर्वोत्तम उपाय आहे. सर्व सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात याची लस उपलब्ध आहे. 
 • लसीकरण वर्षातून दोनदा म्हणजेच मार्च व सप्टेंबर या महिन्यात किंवा लसीच्या प्रमाणित पद्धतीनुसार करून घ्यावे.

संपर्क- डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९
(पशुवैद्यकीय सुक्ष्मजीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक  व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
मिथेन उत्सर्जनावर नियंत्रणाची गरजजनावरे रवंथ करताना मोठ्या प्रमाणात मिथेन वायू...
सांसर्गिक गर्भपाताचे नियंत्रणसर्व वयोगटातील जनावरे सांसर्गिक गर्भपात आजारास...
लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणलाळ्या खुरकूत आजारामुळे जनावराच्या तोंडातून सतत...
गाई, म्हशींचे गाभण काळ, व्यायल्यानंतरचे...गाई, म्हशी गाभण असताना शेवटचे दिवस खूप महत्त्वाचे...
भातशेतीत कीड नियंत्रणासाठी बेडूक...भातशेतीमध्ये विविध किडींचे नैसर्गिक नियंत्रण...
गाई,म्हशीतील गर्भधारणेसाठी योग्य काळ वाढत्या दुग्धोत्पादन क्षमतेसोबतच उच्च उत्पादक गाई...
जनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रणफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक...
शेळ्या-मेंढ्यामधील मावा आजारमावा हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे....
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
रेबीजकडे नको दुर्लक्ष...कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज आजाराचा प्रसार...
घटसर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादनघटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे. बऱ्याच...
संगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचेस्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...