agriculture news in marathi control measure for stem borer in sorghum | Agrowon

असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..

डॉ. भैयासाहेब गायकवाड, डॉ. अजय किनखेडकर
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा दुहेरी उपयुक्ततेचे प्रमुख तृणधान्य आहे. प्रामुख्याने कोरडवाहू पीक घेतले जात असल्याने उत्पादकता कमी आहे. सोबतच विविध किडींचा प्रादुर्भाव हेही उत्पादन कमी येण्यामागील एक कारण आहे. सध्या ज्वारीवर खोडकिडीचा प्रदुर्भाव आढळत आहे.

खोडकीड ही ज्वारीवरील महत्त्वाची कीड असून, तिचा प्रादुर्भाव पूर्ण भारतभर आढळतो. पिकाच्या सर्व अवस्थेत आढळणारी ही कीड वर्षभर सक्रिय असते. मात्र, रब्बी हंगामात उष्ण हवामानात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. संकरित वाण या किडीला जास्त प्रमाणात बळी पडते.

ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा दुहेरी उपयुक्ततेचे प्रमुख तृणधान्य आहे. प्रामुख्याने कोरडवाहू पीक घेतले जात असल्याने उत्पादकता कमी आहे. सोबतच विविध किडींचा प्रादुर्भाव हेही उत्पादन कमी येण्यामागील एक कारण आहे. सध्या ज्वारीवर खोडकिडीचा प्रदुर्भाव आढळत आहे.

खोडकीड ही ज्वारीवरील महत्त्वाची कीड असून, तिचा प्रादुर्भाव पूर्ण भारतभर आढळतो. पिकाच्या सर्व अवस्थेत आढळणारी ही कीड वर्षभर सक्रिय असते. मात्र, रब्बी हंगामात उष्ण हवामानात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. संकरित वाण या किडीला जास्त प्रमाणात बळी पडते.

ओळख

 • या किडीचा पतंग हा गवती रंगाचा आहे. त्याचे समोरील पंख राखाडी पिवळसर असून, त्याच्या कडावर लहान ठिपके असतात. मागील पंख पांढरट असतात.
   
 • अळी मळकट पांढऱ्या रंगाची असून, त्यावर गडद रंगाचे ठिपके असतात. डोके तपकिरी असते.
   
 • पूर्ण वाढ झालेली अळी साधारणतः १२ ते १९ मिमी लांबीची असून, तिच्या अंगावर चार विस्तारित पट्ट्या असतात.

नुकसानीचा प्रकार

 • नुकत्याच अंड्यातून निघालेल्या लहान अळ्या सुरवातीला पानावर उपजीविका करतात. नंतर रोपाच्या मुख्य गाभ्यात शिरून तिथेच एक ते दोन दिवस उपजीविका करते.
   
 • मुख्य गाभ्यात शिरताना गाभ्याला छिद्र पडल्यामुळे, पान उघडल्यानंतर तिथे एका सरळ रेषेत बारीक गोल छिद्रे दिसतात. अळी मुख्य खोडात शिरते. तिथेच उपजीविका करत असल्याने पोंगे मर होते. झाड मरून जाते.
   
 • पीक रोपावस्थेमध्ये असताना प्रादुर्भाव झाल्यास नुकसान जास्त होते. या किडीचा प्रादुर्भाव कणसे बाहेर पडण्याच्या अवस्थेपर्यंत आढळून येतो. असे झाल्यास कणसाच्या देठावर छिद्रे दिसतात. अशी कणसे वाऱ्यानेही मोडू शकतात.
   
 • ही कीड मुख्यतः ज्वारीवर येत असली तरी मका, बाजरी, ऊस व अन्य काही तृणवर्गीय गवतावरही येते.

जीवनक्रम

 • मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूस मुख्य शिरेपाशी किंवा कधीतरी देठापाशी पुंजक्यामध्ये पांढऱ्या रंगाची सुमारे ३०० पर्यंत अंडी घालते.
   
 • अंड्यातून सहा दिवसांनी अळी बाहेर पडते. अळी अवस्था तीन ते चार आठवड्यांची असते.
   
 • कोषावस्थेत जाण्यापूर्वी अळी पतंग अवस्थेमध्ये स्वतःला बाहेर पडण्यासाठी खोडाला एक छिद्र पाडून खोडातच कोषावस्थेत जाते. कोष अवस्था ७ -१० दिवसांची असते.
   
 • पतंग २-४ दिवस जिवंत राहू शकतो. अशा प्रकारे या किडीचा जीवनक्रम सहा ते सात आठवड्यांत पूर्ण होतो.
   
 • एका वर्षात तिच्या चार पिढ्या होतात. अळी अवस्थेत ही कीड धसकटात किंवा कडब्याच्या खोडामध्ये सुप्तावस्थेत राहू शकते.

एकात्मिक व्यवस्थापन

 • जमिनीची खोल नांगरट व कुळवणी करून काडी, कचरा धसकटे वेचून शेत स्वच्छ ठेवावे.
   
 • ज्वारीची कापणी झाल्यावर शेताची नांगरणी करून त्यातील धसकटे गोळा करून नष्ट करावीत. त्यामधील सुप्तावस्थेतील अळ्यांचा नाश होईल.
   
 • रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. त्यापेक्षा अधिक पेरणी लांबल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. काही कारणाने पेरणी लांबल्यास इमिडाक्लोप्रीड (७० टक्के) ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
   
 • प्रादुर्भावग्रस्त शेतातील मळणी झाल्यावर खळ्याभोवती अथवा मळणी यंत्राभोवती पडलेले कणसाचे अवशेष गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी. त्यातील सुप्तावस्थेतील अळ्या व कोष यांचा नाश होईल. शिवाय साठवून ठेवलेले कुटार १५ मेपूर्वी जनावरांना खाऊ घालून संपवावे.
   
 • खोडकिडीमुळे दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास किंवा उगवणीनंतर ३० दिवसांनी फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ इसी) ३ मिली किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्‍के प्रवाही) २.५ मिली.

(टीप- फवारणीचे द्रावण पोंग्यात जाईल याची दक्षता घ्यावी.)

संपर्कः डॉ. भैयासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८
(विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि. बीडअंतर्गत वनामकृवि परभणी.


इतर कृषी सल्ला
स्थानिक वाण, प्रक्रिया पदार्थांना हवे ‘...स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
डाळिंब बागांसाठी पाण्याचे व्यवस्थापनजानेवारी अखेरपासून पाण्याची उपलब्धता कमी होत जाते...
सकाळी सौम्य थंडी; दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
शाश्‍वत विकासासाठी एकात्मिक शेती पद्धतीग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-...
कृषी सल्ला (आंबा, काजू, नारळ, सुपारी,...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून...
शिवारामधील हुंदक्यांच्या मुळांपर्यंत...औद्योगिक क्षेत्र आणि कृषी एकमेकांच्या हातात हात...
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव...सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ...
शेतकरी नियोजन ः पीक केळी----------------------- शेतकरी ः प्रेमानंद हरी...
वांग्यामधील शेंडे, फळ पोखरणाऱ्या अळीचे...नुकसानीचा प्रकार :  अळी पानांच्या...
शेतीचे भवितव्य शाश्‍वत करतानामी  १९६०-७० च्या दशकात अनुभवलेली, जगलेली...
कलिंगड, खरबूज काढणीकलिंगड काढणीस तयार झाल्याची लक्षणे  फळांवर...
तापमानात वाढ, थंडीचे प्रमाण कमी होणार...महाराष्ट्राच्या उत्तरेस १०१२, तर दक्षिणेस १०१०...
सात देशांच्या शेत शिवाराची सैर‘‘काय? बुलेटवरून वीस हजार किलोमीटर आणि तेही सात...
द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना...अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)गहू फुटवे फुटण्याची अवस्था     ...
कृषी सल्ला (कोकण विभाग)किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. फळबाग...
गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणनांदेड, परभणी, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत...
वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणामगेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये वातावरणात बदल...