agriculture news in marathi control measures for aphis gossypii in safflower | Agrowon

असे करा करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापन

डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. हनुमान गरुड, डॉ. अजय किनखेडकर
रविवार, 29 डिसेंबर 2019

करडईवर जगामध्ये  एकूण ७९ प्रकारच्या किडीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात करडईवर ३६ प्रकारच्या किडी आढळून येतात. त्यापैकी मावा, घाटेअळी, उंटअळी, तंबाखुची पाने खाणारी अळी, तुडतुडे, बोंडमाशी, करडईवरील गुझिया सोंडे यांचा समावेश होतो. सध्या राज्यामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव करडईवर सर्वदूर दिसून येत आहे. या किडीमुळे उत्पादनात ५५ ते ८० टक्के घट येऊ शकते.

मावा

ओळख

करडईवर जगामध्ये  एकूण ७९ प्रकारच्या किडीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात करडईवर ३६ प्रकारच्या किडी आढळून येतात. त्यापैकी मावा, घाटेअळी, उंटअळी, तंबाखुची पाने खाणारी अळी, तुडतुडे, बोंडमाशी, करडईवरील गुझिया सोंडे यांचा समावेश होतो. सध्या राज्यामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव करडईवर सर्वदूर दिसून येत आहे. या किडीमुळे उत्पादनात ५५ ते ८० टक्के घट येऊ शकते.

मावा

ओळख

 • मावा अर्धगोलाकार, रंगानी काळा आणि मृदू शरीराचा असून, शरीरावर पाठीमागच्या बाजूस दोन शिंगे असतात.
   
 • पुर्ण वाढ झालेल्या मावा किडीस दोन पंख असतात. पंख असलेल्या माव्याची जास्त संख्या प्रादुर्भाव होण्याच्या सुरुवातीस आणि पिकाच्या शेवटच्या अवस्थेत असते.
   
 • या किडीच्या प्रादुर्भावाची सुरुवात ही शेताच्या काठावरील झाडावर होऊन पुढे ती शेतभर पसरते. 

नुकसानीचा प्रकार

 • प्रौढ तसेच बाल्यावस्थेतील मावा पिकाच्या शेंडे, बोंडाच्या देठावर, कोवळ्या पानाच्या शिरावर, पानाच्या मागील बाजूस, खोड आणि फांद्यावर आढळतो.
   
 • मावा सोंडेद्वारे रस शोषण करतो. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये झाडाचा बराचसा भाग माव्यानी व्यापून टाकल्याने झाडे काळसर दिसतात. पुढे ती वाळतात. 
   
 • पीक फुलोरावस्थेत असताना माव्याचा प्रादुर्भाव जास्त असतो.
   
 • अशा अवस्थेतील प्रादुर्भावामुळे झाडास कमी फुले व बोंडे लागतात. तीव्र प्रादुर्भावांनी झाडे फुले लागण्याआधीच वाळून जातात.
   
 • मावा किडीच्या शरीरातून बाहेर पडलेल्या साखरेसारख्या चिकट पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते.
   
 • पर्यायाने पिकाचे वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादन कमी मिळते. चिकट पदार्थ फुलावर पडल्यामुळे परागीकणाच्या प्रक्रियेवरही प्रतिकूल परीणाम होतो. दाणे कमी प्रमाणात भरतात.

संपर्कः डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८
(कृषी विज्ञान केंद्र, खामगाव ता. गेवराई, जि. बीड.)


इतर तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड...भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
उन्हाळी भुईमूगाचे लागवड तंत्रउन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि...
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापनसध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा...
करडईची सुधारित लागवड करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
खत, पाणी व्यवस्थापनातून वाढवा करडई...योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन, विरळणी आणि...
सुधारित जवस वाणांची लागवड कराजवसाच्या सुधारित वाणाची निवड केल्यास...
अधिक पावसामुळे उद्भवलेल्या सोयाबीन...गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक...
सोयाबीनवरील हिरव्या उंट अळीचे नियंत्रणसद्य परिस्थितीत सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असून...
सोयाबीन पिकांवरील किडींचे एकात्मिक...सोयाबीन पिकात ९० ते ११० दिवसात येणाऱ्या ...
सोयाबीन पाने पिवळी पडण्याचे कारण जाणून...यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस...
तीळ लागवड तंत्रतीळ हे भारतातील सर्वांत जुने तेलबिया पीक आहे....
सोयाबीन लागवडीतील समस्यावरील उपाययोजनासोयाबीनचे योग्य वाण निवडताना... सध्या बाजारात...
सूर्यफूल लागवड नियोजन जमीन : सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
रुंद वरंबा सरी पद्धती भुईमुगासाठी आहे...भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...