Agriculture news in marathi control measures of pink boll worm of cotton | Page 2 ||| Agrowon

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

डॉ. प्रशांत उंबरकर
गुरुवार, 30 जुलै 2020

गुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे संवर्धन, जैविक घटकांचा वापर तसेच गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास किडींचे प्रभावी आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन शक्य आहे.
 

गुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे संवर्धन, जैविक घटकांचा वापर तसेच गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास किडींचे प्रभावी आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन शक्य आहे.

सुरुवातीच्या काळात रासायनिक कीटकनाशकांचा कमीत कमी वापर 

 • पहिल्या तीन महिन्यामध्ये मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा उपयोग करावा.
 • या काळात वनस्पतिजन्य कीटकनाशके आणि जैविक बुरशीनाशके यांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या उपयोगी ठरतात.

कामगंध सापळ्यांचा वापर

 • पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यानंतर, शेतामध्ये गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे पिकाच्या उंचीपेक्षा एक फूट उंचीवर लावावेत. त्यामध्ये गुलाबी बोंडअळीचे लिंग प्रलोभने गोसीप ल्युर बसवावे. या कामगंध सापळ्यांमध्ये गुलाबी बोंडअळीचे नर पतंग अडकतात. त्यामुळे पुढील तयार होणाऱ्‍या पिढीस अडथळा निर्माण करून संख्या कमी करता येते.
 • कामगंध सापळ्यांमध्ये ८ ते १० पतंग सतत २ ते ३ दिवस आढळून आल्यास त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात.

प्रकाश सापळ्यांचा वापर

 • एकरी एक सापळा वापरावा. सापळा सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवावा.
 • हानिकारक किडीचे नर आणि मादी दोन्हीही प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात. त्यामुळे त्यांच्या मिलनात अडथळा निर्माण होऊन नवीन येणाऱ्या पिढीला प्रतिबंध केला जातो.

डोमकळ्या अळीसहित नष्ट करणे

 • गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेली फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, यालाच ‘डोमकळी’ म्हणतात. या पिकात इतर कोणत्याच किडीच्या प्रादुर्भावामुळे अशी डोमकळी तयार होत नाही.
 • पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर दर आठवड्याला झाडांचे निरीक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त फुले जमा करून अळ्यासहित नष्ट करावे.

ट्रायकोकार्डचा वापर

 • पीक पात्यावर आल्यानंतर १० दिवसांच्या अंतराने, ट्रायकोग्रामा या परोपजीवी मित्र कीटकांची अंडी असलेले ट्रायकोकार्ड एकरी ३ या प्रमाणात ७ ते ८ कार्ड शेतात लावावीत.
 • ट्रायकोकार्डवरील अंड्यातून मित्र कीटक बाहेर पडतात. हे मित्र कीटक बोंडअळ्यांची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. त्यामुळे बोंडअळ्यांचा अंडी अवस्थेतच बंदोबस्त केला जातो.

 सर्वेक्षणावर आधारीत कीटकनाशक फवारणी
आर्थिक नुकसान संकेत पातळी आधारित केंद्रीय कीटकनाशक बोर्ड यांनी शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.

आर्थिक नुकसान पातळी

 • प्रति कामगंध सापळा सतत तीन दिवस आठ पतंग किंवा
 • १ अळी प्रति १० फुले किंवा १० हिरवी बोंडे

आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास,
फवारणी (प्रति लिटर पाणी)

जैविक कीडनाशकांची फवारणी

 • सुरुवातीला पात्या, फुलोरा व बोंडे धरण्याच्या अवस्थेमध्ये,
 • ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि
  पुरेशी आर्द्रता असताना,
 • बिव्हेरीया बॅसियाना (जैविक कीडनाशक) (१.१५ टक्के डब्ल्यू.पी.) ५ ग्रॅम

रासायनिक फवारणी

 • क्विनॉलफॉस (२० टक्के ए.एफ.) २.५ मिलि किंवा
 • थायोडीकार्ब (७५ डब्ल्युपी) २ ग्रॅम 
  (कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे)
 • शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा योग्य मात्रेसह अवलंब करावा. एकाच कीटकनाशकाचा सतत वापर करू नये.
 • शेतात पक्षी थांबे उभारावेत. शिफारशीत नसलेली विविध कीटकनाशके, संजीवके, अन्नद्रव्ये यांचे मिश्रण करून फवारणी करू नये.
 • रासायनिक कीटकनाशके फवारताना सर्व सुरक्षा विषयक नियमांचे पालन करावे.

संपर्क- डॉ. प्रशांत उंबरकर, ८२०८३७९५०१
(शास्त्रज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, वर्धा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला )


इतर नगदी पिके
उसावरील रोगांचा ओळखा प्रादुर्भाव सध्याच्या पावसाळी वातावरणात ऊस जोमदार वाढीच्या...
उसावरील खोड कीड, लोकरी मावा, हुमणीचे...ऊस पिकामध्ये प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड,...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचे...राज्यामध्ये उसाची लागवड आडसाली, पूर्वहंगामी आणि...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजनउसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...