केळीतील करपा रोग व्यवस्थापन

control measures for sigatoka disease in banana
control measures for sigatoka disease in banana

केळीतील करपा हा बुरशीजन्य रोग असून याच्या लैंगिक व अलैंगिक अशा दोन अवस्था असतात. अतिविस्तृत प्रमाणात केलेली लागवड, पहाटे पडणाऱ्या दवबिंदूमुळे पाने ४ ते ५ तास ओली राहणे, त्यानंतर पडणारे स्वच्छ ऊन, वाहणारे वारे असे वातावरण रोगास पोषक असते. योग्य वेळी रोग व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट येते.  हवेतील उच्च आर्द्रता ढगाळ वातावरण, हवेचे २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान, एकाच वाणाची अति विस्तृत प्रमाणात केलेली लागवड, रोगयुक्त पाने न कापणे, पिलांची अतिरिक्त वाढ, पोटॅशची कमतरता असलेल्या कमी निचऱ्याच्या हलक्या जमिनीत केलेली लागवड इत्यादी कारणांमुळे रोगाची तीव्रता वाढते.     लक्षणे  

  • पानांवर प्रथम फिकट पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात. ठिपके वाढत जाऊन लांबट पिवळ्या रेषा एकमेकांत मिसळून मोठ्या आकाराचे राखट ठिपके तयार होतात.  
  • असे ठिपके पानाच्या सर्व भागांवर पसरून पूर्ण पान वाळलेले दिसते.  
  • जमिनीलगतच्या जुन्या ३ ते ४ पानांवर जास्त प्रादुर्भाव दिसून येतो.   
  • पाने अकाली पिवळी पडून देठाशी मुडून लटकलेली दिसतात. फळे अकाली पिकतात.  
  • झाडांवरील कार्यक्षम पानांची संख्या कमी होते आणि अन्न तयार होण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊन झाडाची वाढ खुंटते. परंतु झाड मरत नाही.
  • रोग व्यवस्थापन   

  • रोगट पाने देठासह कापून शेताबाहेरील जमिनीत खोल पुरावीत.    
  • पानांचा ३० टक्क्यांपेक्षा जास्त भाग रोगग्रस्त झाल्यास, तेवढाच भाग खुरप्याने कापून टाकावा.  
  • कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा 
  • टेब्युकोनॅझोल (५० टक्के) + ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबीन (२५ टक्के) १ ग्रॅम (संयुक्त बुरशीनाशक) किंवा
  • प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के प्रवाही) १ मिलि प्रति लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.  
  • पहिल्या फवारणीनंतर रोगाच्या तीव्रतेनुसार १० ते १५ दिवसाच्या अंतराने,  प्रोपीकोनॅझोल १ मिलि अधिक  मिनरल ऑइल १० मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन ४ ते ५ फवारण्या घ्याव्यात. 
  • टीप -

  • वरील शिफारशींना लेबलक्लेम आहे.
  • रोगाच्या नियंत्रणासाठी सामूहिकरीत्या गावपातळीवर एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.  
  • संपर्क ः  डॉ. के. बी. पवार, ०२५७-२२५०९८६.  (केळी संशोधन केंद्र, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com