असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा कीडीचे व्यवस्थापन

stem fly and mava pest in wheat crop
stem fly and mava pest in wheat crop

गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा वापर सुरू केल्यापासून खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळण्यास सुरुवात झाली. चालू खरीप हंगामात खोडमाशीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील काही भागात आढळून येत आहे. त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन योग्य वेळी करणे आवश्‍यक आहे.    खोडमाशी 

  • उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो.   
  • ढगाळ हवामान किडीस पोषक असते. किडीची अळी दवबिंदूतील ओलाव्याच्या मदतीने पोंग्यात शिरून गाभा खाते. त्यामुळे रोपमर तसेच फुटवे मर दिसून येते.  
  • पूर्ण वाढ झालेली अळी ८ ते १० मिमि लांब असून पिवळसर रंगाची असते. मृत पोंगा ओढल्यास तळाशी खोडमाशीची अळी दिसून येते.  
  • नियंत्रण  पोंगेमर किंवा फुटवे मर दिसून आल्यास ॲझाडिरेक्टीन (नीमयुक्त कीटकनाशक) १ मिलि किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून १ ते २ फवारण्या कराव्यात.   मावा 

  • ही कीड पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषते, त्यामुळे पाने पिवळसर पडतात.  
  • कीड मधाप्रमाणे गोड, चिकट द्रव विष्ठेवाटे पानांवर सोडते. त्यावर काळी बुरशी वाढून पाने काळे होतात, त्यामुळे पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावून रोपे मरतात.  
  • किडीचा प्रादुर्भाव पानांबरोबरच ओंबीवर, खोडावरही दिसतो.    
  • कोरडवाहू पिकामध्ये जमिनीला भेगा पडून उघड्या झालेल्या मुळांवरही मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. या कीडीने मुळातील रस शोषून घेतल्यामुळे मुळांची वाढ खुंटते. रोपे पिवळी पडतात. 
  • नियंत्रण 

  • जैविक नियंत्रणासाठी लेकॅनिसिलीयम लेकॅनी किंवा मेटाऱ्हायझीम ॲनिसोप्ली ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.   
  • थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी.) ०.४ ग्रॅम किंवा ॲसिटामीप्रिड (२० एसपी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने १ ते २ फवारण्या कराव्यात.
  • संपर्कः प्रा. भालचंद्र म्हस्के, ९८५०२४३४२६ (कृषी संशोधन केंद्र, निफाड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com