agriculture news in marathi control measures for stem fly and mava pest in wheat crop | Agrowon

असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा कीडीचे व्यवस्थापन

प्रा. भालचंद्र म्हस्के, डॉ. बबनराव इल्हे, डॉ. सुरेश दोडके
शनिवार, 28 डिसेंबर 2019

गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा वापर सुरू केल्यापासून खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळण्यास सुरुवात झाली. चालू खरीप हंगामात खोडमाशीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील काही भागात आढळून येत आहे. त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन योग्य वेळी करणे आवश्‍यक आहे. 

  खोडमाशी 

गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा वापर सुरू केल्यापासून खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळण्यास सुरुवात झाली. चालू खरीप हंगामात खोडमाशीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील काही भागात आढळून येत आहे. त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन योग्य वेळी करणे आवश्‍यक आहे. 

  खोडमाशी 

 • उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. 
   
 • ढगाळ हवामान किडीस पोषक असते. किडीची अळी दवबिंदूतील ओलाव्याच्या मदतीने पोंग्यात शिरून गाभा खाते. त्यामुळे रोपमर तसेच फुटवे मर दिसून येते.
   
 • पूर्ण वाढ झालेली अळी ८ ते १० मिमि लांब असून पिवळसर रंगाची असते. मृत पोंगा ओढल्यास तळाशी खोडमाशीची अळी दिसून येते.  

नियंत्रण 

पोंगेमर किंवा फुटवे मर दिसून आल्यास ॲझाडिरेक्टीन (नीमयुक्त कीटकनाशक) १ मिलि किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून १ ते २ फवारण्या कराव्यात.

  मावा 

 • ही कीड पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषते, त्यामुळे पाने पिवळसर पडतात.
   
 • कीड मधाप्रमाणे गोड, चिकट द्रव विष्ठेवाटे पानांवर सोडते. त्यावर काळी बुरशी वाढून पाने काळे होतात, त्यामुळे पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावून रोपे मरतात.
   
 • किडीचा प्रादुर्भाव पानांबरोबरच ओंबीवर, खोडावरही दिसतो.  
   
 • कोरडवाहू पिकामध्ये जमिनीला भेगा पडून उघड्या झालेल्या मुळांवरही मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. या कीडीने मुळातील रस शोषून घेतल्यामुळे मुळांची वाढ खुंटते. रोपे पिवळी पडतात. 

नियंत्रण 

 • जैविक नियंत्रणासाठी लेकॅनिसिलीयम लेकॅनी किंवा मेटाऱ्हायझीम ॲनिसोप्ली ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात. 
   
 • थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी.) ०.४ ग्रॅम किंवा ॲसिटामीप्रिड (२० एसपी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने १ ते २ फवारण्या कराव्यात.

संपर्कः प्रा. भालचंद्र म्हस्के, ९८५०२४३४२६
(कृषी संशोधन केंद्र, निफाड)


इतर तृणधान्ये
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
आहारात असावी आरोग्यदायी बाजरीगहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी,...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
पेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
तयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
गहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...
गहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...