agriculture news in marathi control measures of stem fly in sorghum and wheat crop | Agrowon

गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

डॉ. संजोग बोकन, डॉ. अनंत बडगुजर    
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे. पिकाच्या सुरुवातीपासून खोडमाशीचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. ही कीड नुकसानकारक असून, वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
 

बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे. पिकाच्या सुरुवातीपासून खोडमाशीचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. ही कीड नुकसानकारक असून, वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

खोडमाशी (Atherigona soccata)
ओळख 

 • ही माशी काळ्या रंगाच्या घरमाशीप्रमाणे दिसणारी, मात्र आकाराने लहान असते. 
 • सुरुवातीच्या अवस्थेत अळी पांढऱ्या रंगाची  असते. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळसर  असते. तिला पाय नसतात.

जीवनक्रम

 • अंडी, अळी, कोष व प्रौढ माशी या अवस्था असतात. 
 • प्रौढ माशी पानाच्या खालच्या बाजूस एक-एक अशी ४० ते ५० अंडी घालते. 
 • २ ते ३ दिवसांनी अंड्यातून पांढऱ्या रंगाची अळी बाहेर पडते. अळी तिचा जीवनक्रम खोडात १० ते १२ दिवसांत पूर्ण करते. 
 • खोडामध्येच ७ दिवसांची कोष अवस्था पूर्ण करते. 
 • कोषातून प्रौढ माशी बाहेर पडते. मिलनानंतर अंडे द्यायला सुरुवात करते. 
 • अशाप्रकारे माशीची २ ते ३ आठवड्यांत एक पिढी पूर्ण करून वर्षभरात अनेक पिढ्या तयार होतात. 
 • या किडीची अळी व कोष या सुप्तावस्था कडब्यामध्येही आढळून येत असतात.

प्रादुर्भावाची वेळ 

 • खोडमाशीचा प्रादुर्भाव फक्त रोपावस्थेत दिसून येतो. 
 • उशिरा पेरणी झालेल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. 
 • ढगाळ वातावरणात या किडीची वाढ झपाट्याने होते.

नुकसान प्रकार 

 • खोडमाशी प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, मका व गहू या पिकावर उपजीविका करते. 
 • अळी रोपाच्या बुडापर्यंत जाऊन खोडाला छिद्र पाडते. आत शिरून वाढणाऱ्या पोंग्यावर उपजीविका करते. त्यामुळे सुरुवातीला मधला वाढणारा रोपाचा भाग पिवळसर पडून नंतर तो मरून जातो. यालाच ‘पोंगेमर’ असे म्हणतात. 
 • लहान रोपे या किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णतः मरून जातात. मोठ्या रोपांना बाजूने फुटवे फुटून उत्पादनात घट दिसून येते. 

व्यवस्थापन

 • पिकाच्या कापणीनंतर शेताची नांगरणी करून त्यातील धसकटे गोळा करून नष्ट करावीत. त्यामुळे सुप्त अवस्थेतील अळ्यांचा नाश होण्यास मदत होईल.
 • पिकाची फेरपालट करावी. शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी पेरणी शक्यतो एका आठवड्याच्या आत व वेळेवर पूर्ण करावी.  
 • पेरणीस उशीर झाल्यास बियाण्याचे प्रमाण वाढवावे. 
 • बीजप्रक्रिया : इमिडाक्लोप्रिड (४८ एफएस) १२ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (७० डब्ल्यूएस) १० मि.लि. प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास खोडमाशीपासून पिकाचे संरक्षण होते.
 • निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी. 
 • खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास किंवा १० टक्के पोंगेमर असल्यास रासायनिक नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
 • गहू पिकासाठी : सायपरमेथ्रिन (१० ईसी) १.१ मि. लि.
 • ज्वारी पिकासाठी : क्विनालफॉस (२५ ईसी) ३ मि. लि.

अशा प्रकारे सुरुवातीपासून उपाययोजना केल्यास खोडमाशीचे प्रभावी व्यवस्थापन होईल.
(कीटकनाशकांना लेबल क्लेम आहेत.)

संपर्क ः डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२०००
(संशोधन सहयोगी, कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...