केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रण

केळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त प्रमाणात आढळतात. सूत्रकृमी अतिसूक्ष्म लांबट धाग्यासारखे, पारदर्शक व रंगहीन असतात. त्यांची लांबी ०.२ ते ०.५ मिमी असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत.
infestation of nematodes on Banana tree
infestation of nematodes on Banana tree

केळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त प्रमाणात आढळतात. सूत्रकृमी अतिसूक्ष्म लांबट धाग्यासारखे, पारदर्शक व रंगहीन असतात. त्यांची लांबी ०.२ ते ०.५ मिमी असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. केळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त प्रमाणात आढळतात. सूत्रकृमी अतिसूक्ष्म लांबट धाग्यासारखे, पारदर्शक व रंगहीन असतात. त्यांची लांबी ०.२ ते ०.५ मिमी असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. केळीच्या कंदामध्ये सूत्रकृमीची मादी दररोज ४ ते ६ अंडी घालते, त्यातून छोटे कृमी बाहेर पडतात. हे सूत्रकृमी मुळांच्या टोकांकडून आत घुसून नुकसान करतात. सूत्रकृमींचे वर्गीकरण मुळांवर चट्टे किंवा जखमा करणारे सूत्रकृमी

  • प्रजाती-  प्राटायलेनचस कॉफी, रेडॉफिलस सिमीलिस व हेलिकोटायलेनचस मल्टीसिन्कटस
  • सूत्रकृमी मुळांच्या पेशीमधून अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे मुळांच्या अक्षाभोवती समांतर रेषेत तपकिरी लाल ते काळ्या रंगाचे लंबाकार डाग तयार होतात.
  • मुळांमधील पेशी मरतात. त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होऊन झाडाचा जोम कमी होतो, ते मलूल होते. फळधारणा कमी होते. मुळांअभावी झाडाचे खोड जमिनीवर कोसळते.
  • मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी 

  • प्रजाती-  मेलायडोगायनी इनकॉगनीटा व मेलायडोगायनी जावानिका
  • बहुभक्षी सूत्रकृमी आहे, विविध पिकांवर प्रादुर्भाव होतो.
  • सूत्रकृमींमुळे मुळांवर गाठी दिसून येतात. मुळातील अन्नरसावर जगतात. मुळे काळी पडून कुजतात. मुळांवर गाठी तयार होऊन वाढ खुंटते.
  • उपाययोजना 

  • सूत्रकृमीग्रस्त जमिनीची खोल नांगरट करून २ ते ३ महिने उन्हामध्ये तापू द्यावी. त्यामुळे सूत्रकृमीच्या अवस्था उष्णतेमुळे मरतात.
  • पीक फेरपालट करावी. लागवडीपूर्वी जमिनीमध्ये धैंचा किंवा ताग ही हिरवळीची पिके घ्यावीत.
  • लागवडीपूर्वी कंद चांगल्या प्रकारे तासून नंतर कंद प्रक्रिया करावी. यासाठी निंबोळीवर आधारित कीटकनाशक ॲझाडीरेक्टिन (१५०० पीपीएम) २० मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून ३० मिनिटे प्रक्रिया करावी.(केळी संशोधन केंद्राची शिफारस)
  • पाण्याचा योग्य निचरा करावा. बाग नेहमी स्वच्छ ठेवावी.
  • बागेमध्ये झेंडूचे आंतरपीक घेतल्यास सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होतो. झेंडूच्या मुळामधून स्रवणारे अल्फा टर्थेनाईल नावाचे रसायन सूत्रकृमीनाशक असते.
  • लागवडीवेळी सुडोमोनास फ्लोरोसन्स (०.५ टक्के डब्लूडब्लू) (२ बाय १०*९ बीजकण प्रति ग्रॅम) २० ग्रॅमअधिक २५० ग्रॅम निंबोळी पेंड पावडर प्रति झाड खोडाभोवती बांगडी पद्धतीने द्यावे. तिसऱ्या व सहाव्या महिन्यात ही प्रक्रिया पुन्हा करावी. (केळी संशोधन केंद्राची शिफारस)
  • प्रादुर्भाव जास्त असल्यास केळीचा खोडवा घेणे टाळावे.
  • संपर्क- डॉ.के.बी.पवार, ९८२२४४३६९२ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (केळी), जळगाव.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com