Agriculture news in marathi Control of nematodes in bananas | Agrowon

केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रण

एन.बी.शेख, डॉ.के.बी.पवार, एस.बी.माने
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

केळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त प्रमाणात आढळतात. सूत्रकृमी अतिसूक्ष्म लांबट धाग्यासारखे, पारदर्शक व रंगहीन असतात. त्यांची लांबी ०.२ ते ०.५ मिमी असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत.
 

केळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त प्रमाणात आढळतात. सूत्रकृमी अतिसूक्ष्म लांबट धाग्यासारखे, पारदर्शक व रंगहीन असतात. त्यांची लांबी ०.२ ते ०.५ मिमी असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत.

केळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त प्रमाणात आढळतात. सूत्रकृमी अतिसूक्ष्म लांबट धाग्यासारखे, पारदर्शक व रंगहीन असतात. त्यांची लांबी ०.२ ते ०.५ मिमी असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. केळीच्या कंदामध्ये सूत्रकृमीची मादी दररोज ४ ते ६ अंडी घालते, त्यातून छोटे कृमी बाहेर पडतात. हे सूत्रकृमी मुळांच्या टोकांकडून आत घुसून नुकसान करतात.

सूत्रकृमींचे वर्गीकरण
मुळांवर चट्टे किंवा जखमा करणारे सूत्रकृमी

 • प्रजाती- प्राटायलेनचस कॉफी, रेडॉफिलस सिमीलिस व हेलिकोटायलेनचस मल्टीसिन्कटस
 • सूत्रकृमी मुळांच्या पेशीमधून अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे मुळांच्या अक्षाभोवती समांतर रेषेत तपकिरी लाल ते काळ्या रंगाचे लंबाकार डाग तयार होतात.
 • मुळांमधील पेशी मरतात. त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होऊन झाडाचा जोम कमी होतो, ते मलूल होते. फळधारणा कमी होते. मुळांअभावी झाडाचे खोड जमिनीवर कोसळते.

मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी 

 • प्रजाती- मेलायडोगायनी इनकॉगनीटा व मेलायडोगायनी जावानिका
 • बहुभक्षी सूत्रकृमी आहे, विविध पिकांवर प्रादुर्भाव होतो.
 • सूत्रकृमींमुळे मुळांवर गाठी दिसून येतात. मुळातील अन्नरसावर जगतात. मुळे काळी पडून कुजतात. मुळांवर गाठी तयार होऊन वाढ खुंटते.

उपाययोजना 

 • सूत्रकृमीग्रस्त जमिनीची खोल नांगरट करून २ ते ३ महिने उन्हामध्ये तापू द्यावी. त्यामुळे सूत्रकृमीच्या अवस्था उष्णतेमुळे मरतात.
 • पीक फेरपालट करावी. लागवडीपूर्वी जमिनीमध्ये धैंचा किंवा ताग ही हिरवळीची पिके घ्यावीत.
 • लागवडीपूर्वी कंद चांगल्या प्रकारे तासून नंतर कंद प्रक्रिया करावी. यासाठी निंबोळीवर आधारित कीटकनाशक ॲझाडीरेक्टिन (१५०० पीपीएम) २० मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून ३० मिनिटे प्रक्रिया करावी.(केळी संशोधन केंद्राची शिफारस)
 • पाण्याचा योग्य निचरा करावा. बाग नेहमी स्वच्छ ठेवावी.
 • बागेमध्ये झेंडूचे आंतरपीक घेतल्यास सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होतो. झेंडूच्या मुळामधून स्रवणारे अल्फा टर्थेनाईल नावाचे रसायन सूत्रकृमीनाशक असते.
 • लागवडीवेळी सुडोमोनास फ्लोरोसन्स (०.५ टक्के डब्लूडब्लू) (२ बाय १०*९ बीजकण प्रति ग्रॅम) २० ग्रॅमअधिक २५० ग्रॅम निंबोळी पेंड पावडर प्रति झाड खोडाभोवती बांगडी पद्धतीने द्यावे. तिसऱ्या व सहाव्या महिन्यात ही प्रक्रिया पुन्हा करावी. (केळी संशोधन केंद्राची शिफारस)
 • प्रादुर्भाव जास्त असल्यास केळीचा खोडवा घेणे टाळावे.

संपर्क- डॉ.के.बी.पवार, ९८२२४४३६९२
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (केळी), जळगाव.)


इतर कृषी प्रक्रिया
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...
उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...
टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...
पनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...
आल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...
डाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...
कृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...
पेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...
चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रणकेळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
डाळिंबासाठी पायाभूत सुविधांच्या...येत्या काळात डाळिंब फळांच्या बरोबरीने रस, पावडर,...