सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून ठेवतात ः शेट्टी  

राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री संशयास्पदपणे झालेली आहे. यात भाजपसहित सर्वच पक्ष गुंतलेले आहेत. मात्र किरीट सोमय्या फक्त ‘जरंडेश्‍वर’ कारखान्याबाबत आरोप करीत आहेत.
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून ठेवतात ः शेट्टी   Convenience cases Somaiya covers: Shetty
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून ठेवतात ः शेट्टी   Convenience cases Somaiya covers: Shetty

पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री संशयास्पदपणे झालेली आहे. यात भाजपसहित सर्वच पक्ष गुंतलेले आहेत. मात्र किरीट सोमय्या फक्त ‘जरंडेश्‍वर’ कारखान्याबाबत आरोप करीत आहेत. सोयीच्या माणसांचे झाकून ठेवायचे आणि गैरसोयीच्या लोकांची प्रकरणे बाहेर काढण्याची त्यांची भूमिका चुकीची आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.  पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो. सगळ्याचं काढा. त्याला आमचा पाठिंबा आहे. मुळात, सोमय्या ज्या कारखान्यांबाबत आरोप करीत आहेत ते पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे होणार आहेत का? या प्रकरणात मी सोमय्यांपेक्षाही दोन पावले पुढे आहे. कारण सहा वर्षांपूर्वी मी साखर कारखाने विक्रीचा घोटाळा समोर आणला होता. तेच मुद्दे घेऊन आज सोमय्या बोलत आहेत. त्यात नवे काहीच नाही. मी आरोप करीत असताना ‘ईडी’ने दखल का घेतली नाही, ‘ईडी’ त्या वेळी खुळी होती काय, असा माझा सवाल आहे.’’  कारखान्यांच्या विक्री प्रकरणात एकमेव ‘जरंडेश्‍वर’ नाही, असे स्पष्ट करीत शेट्टी म्हणाले, ‘‘माझ्याकडे या कारखान्यांची यादी आहे. ती प्रसारमाध्यमांना देण्यास मी तयार आहे. मी मात्र कोणालाही पाठीशी घालणार नाही. सगळेच चोर आहेत आणि चोरांना शासन झालेच पाहिजे. थेऊरचा साखर कारखाना चालविण्यासाठी भागभांडवल देण्यास सभासद शेतकरी पुढे आले होते. आम्ही दहा वेळा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेलो. पण त्यांनी शेतकऱ्यांचे ऐकले नाही. आताही सरकार बदलले, पण शेतकऱ्यांना लुटण्याची वृत्ती बदलली नाही.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com